आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस कोचची मागणी:करिअरच्या रूपात कॉर्पोरेट जॉब्सऐवजी बिझनेस कोचचा पर्याय निवडू शकतात मॅनेजमेंट ग्रॅज्युएट््स

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौरभ कौशिक एक प्रसिद्ध बिझनेस कोच म्हणून परिचित आहेत. इंडस्ट्री लीडर्स, प्रसिद्ध आंत्रप्रेन्योर्सना आपला व्यवसाय वाढवण्यात बिझनेस कोचिंगच्या माध्यमातून ते मदत करतात. बिझनेसमध्ये मोठी वाढ मिळवण्यात सहकार्य करण्यात त्यांची ख्याती आहे. सौरभ यांच्याप्रमाणेच राहुल जैन स्मॉल मीडियम इंटरप्रायजेसला नेक्स्ट लेव्हलपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे निशिता मंत्री, महिला आंत्रप्रेन्योर्सना कोचिंग मार्गदर्शन करतात. ज्या कंपन्या उत्तम कामगिरी करू शकत नाहीत, अशांना बिझनेस कोचिंग उपलब्ध असल्याचे मानले जाते. खरे तर हे एक मिथक आहे.

मायक्रोसॉफ्ट फाउंडर बिल गेट्स आणि अमेरिकन आंत्रप्रेन्योर एरिक श्मिट बिझनेस कोचसमवेत काम करण्यासाठी ओळखले जातात. चांगले बिझनेस कोच आंत्रप्रेन्योर्सना चांगले निकाल देऊ शकतात. गेल्या काही वर्षात बिझनेस कोचनी करिअरचा एक पर्याय म्हणून जागा पक्की केली. ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप मॉनिटर रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले की, ५४ टक्के युवा उद्यमींनी मान्य केले की, अपयशाच्या भितीने त्यांनी नवीन व्यवसायाचे नियोजन केले नाही. येथे बिझनेस कोचची भूमिका पुढे येते. हेे जाणकार केवळ उद्योगच उभारण्यात मदत करत नाहीत तर तोे पुढे नेण्यासही सहाय्य करतात. एमबीए केलेले अनेक विद्यार्थी बिझनेस कोच म्हणून करिअर घडवत आहेत.

वरिष्ठ व्यावसायिकांनाही प्रशिक्षण एक बिझनेस कोच कोणत्याही व्यवसायाकडे ३६० डिग्री कोनातून पाहू शकतो. स्टार्टअप योग्य दिशेने जात आहे की नाही, याचे ते मूल्यमापन करतात. त्यामुळे संस्था व टीमची आव्हाने समजून घेणारा, कंपनीच्या विकासासाठी काम करणारा, त्यानुसार निकाल देणाऱ्या बिझनेस कोचचा शोध सुरू असतो. अनेक कंपन्या मोठ्या पदावरील आपल्या अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देतात. व्यवसायात चांगली वाढ व्हावी हा त्यामागचा हेतू.

बिझनेस कोच, युवा उद्यमींना स्टार्टअप प्लॅन करण्यासाठी आणि रेव्हेन्यू मॉडेल समजून सांगण्यात मदत करतात. व्यवसायात नफा कसा मिळवता येईल, हेही ते समजावून सांगतात. कॉर्पोरेट लीडर जास्त यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडून प्रशिक्षणही घेतात. बिझनेस कोच, बिझनेस लीडर्सना विकसित करण्यात आणि त्यांच्या नेतृत्त्वाला उत्तम परिणाम देण्याच्या कार्यात निपुण असतात. ते कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतात. ते बिझनेस लीडर्सना पूर्णपणे समजून घेतात.

या कामासाठी कोणती योग्यता हवी? तुमच्याकडे एमबीएच्या डिग्रीसह काही वर्षे व्यवसाय करण्याचा अनुभव असेल तर तुम्हाला बिझनेस कोचच्या रूपात कारकीर्द सुरू करण्यात अडचण येणार नाही. अर्थात ही अट अनिवार्य नाही. बहुतांश लीडर्स डिग्रीहून जास्त रिझल्टवर फोकस करतात. आपला एखादा गुण विकसित करावा. उदाहरणार्थ, ऑब्जेक्टिव्हचा रिझल्ट्स, बिझनेस ग्रोथ, लीडरशिप स्किल्स, टॅलेंट डेव्हलपमेंट इत्यादी. बिझनेस कोचच्या रुपात स्वत:ची ब्रँडिंग स्ट्रॅटेजीही तयार करा.

बातम्या आणखी आहेत...