आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात ठिकठिकाणी झुंडशाही, दादागिरीच्या घटना घडत आहेत, मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. ११ मे रोजी सायंकाळी तर चिश्तिया चौकातील पोलिस चौकीजवळ असलेल्या हॉटेल फिजामध्ये आरेफ ऊर्फ बबलू खान शेर खान या आरोपीने व त्याच्या सहकाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा घातला. बिल देण्यास नकार देत चाकूचा धाक दाखवून हप्ता मागितला. पैसे न दिल्याने व्यावसायिकाला बेदम मारहाणही केली.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे असूनही पोलिसांनी तब्बल ३२ तासांनंतर गुन्हा दाखल केला. बबलू हा गुंड काही पोलिस अधिकाऱ्यांचा ‘खबऱ्या’ असल्याची चर्चा आहे. दहा टवाळखोरांनी धिंगाना घातलेला असताना प्रत्यक्षात बबलू व त्याच्या तीन मित्रांवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रवीण जैस्वाल यांचे चिश्तिया चौकात हॉटेल आहे. या हॉटेलला लागून काही दुकाने सोडले की सिडको पोलिस ठाण्याची चौकी आहे. ११ मे रोजी हॉटेलचे व्यवस्थापक शकील खान हे सहकाऱ्यांसह नियमित काम करत होते. त्याच वेळी बबलू व त्याचे तीन मित्र दुपारी तीन वाजता हॉटेलमध्ये गेले. पाच वाजेपर्यंत त्यांनी यथेच्छ दारू पिली. त्यानंतर वेटरने बिल दिले. पण पैसे न देताच बबलू निघू लागला. शकील खानने त्याच्याकडे बिलाबाबत विचारणा केली. त्यावर ‘मैं पैसे नही देगा, बल्की तुम मुझें पैसे दोगे और तू अभी हमको पैसा देगा’ असे म्हणत शकील यांना थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. शकील यांनी पैसे देण्यास विरोध केला.
त्यावर ‘तू हमे क्यूं नही पेहचनता’ असे म्हणत धारधार चाकू काढून धमकावणे सुरू केले. हा प्रकार सुरू असतानाच बबलूच्या साथीदारांनी बाहेरून दगड आणून शकील यांच्या पाठीत घातला व मारहाण सुरू केली. पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमली. टवाळखोरांचे आणखी साथीदार जमा होऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.