आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव:दोन वर्षांपासून पडून असलेले ढोल-ताशे दुरुस्त करून घेण्यावरच मंडळांचा भर; यंदा पुणेरी ढोलची क्रेझ वाढली

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार-पाच दिवसांवर गणेशाेत्सव येऊन ठेपल्याने सार्वजनिक मंडळांतील कार्यकर्त्यांच्या तयारीला वेग आला आहे. मंडप उभारणीचे काम सुरू झाले असून ढोल-ताशे पथकांच्या सरावालाही सुुरुवात झाली आहे. पैठण गेटजवळ ढोलची दुकाने थाटण्यात आली असली तरी नवीन खरेदीपेक्षा गेल्या दोन वर्षांपासून वापरात नसलेले ढोल-ताशे दुरुस्त करून घेण्याकडे मंडळांचा कल दिसून येतो. दरम्यान, जे मंडळ खरेदी करत आहेत त्यांची सर्वाधिक पसंती पुणेरी ढोललाच आहे, अशी माहिती ‘बॉम्बे ढोल’चे मालक शेख सोहेब यांनी दिली.

औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर ढोलपथके आहेत. यात मुलींचाही सहभाग लक्षणीय असतो. पण गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकाच निघालेल्या नसल्यामुळे या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला होता. आता कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे राज्य सरकारने उत्सवावरील सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे सुमारे १५ ते २० दिवसांपासून मंडळांनी ढोल-ताशांचा सराव सुुरू केला आहे. शहरात पैठण गेट येथे ढोल-ताशांची दुकाने दरवर्षी लागतात. उत्सव जवळ आला की त्यांच्याकडे खरेदीसाठी लगबग सुरू होते. यंदा मात्र जुने ढोल दुरुस्तीबाबत विचारणा करणारेच जास्त युवक येत आहेत, असे शेख यांनी सांगितले.

बाजारपेठेत सिंघम, जम्बो ढोलची क्रेझ संपली; पुणेरी ढोलचा डंका ‘सिंघम’ चित्रपट गाजल्यापासून बाजारपेठेत ‘सिंघम’ नामक ढोलची क्रेझ वाढली होती. त्यानंतर जम्बो ढोलसुद्धा बाजारात आणले गेले. मात्र या वर्षी पुणेरी ढोलची जास्त मागणी आहे. १८ टक्के जीएसटी लागल्याने फायबर ढोलच्या किमतीही १० टक्क्यांनी वाढल्या आहेत, अशी माहिती शेख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...