आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्यभरातून दिंड्या, पताका घेत सुमारे ४ लाख वारकऱ्यांची मांदियाळी नाथसागर धरणाजवळ जमली. पंढरपूरच्या वारीनंतर नाथषष्ठीची वारी ही सर्वात मोठी असते. येथे दिंडीतील वारकरी घरच्या देव्हाऱ्यातील देव आणतात. गोदाकाठावर त्यांना स्नान घालतात.
फोटोवॉक : ६ तासांत टिपले तब्बल ३ हजार फोटो
वारीत छत्रपती संभाजीनगरातील ३० हौशी छायाचित्रकारांनी फोटोवॉक करत ६ तासांत ३ हजार फोटो टिपले. श्रीकृष्ण पाटील यांनी हे विहंगम छायाचित्र खास दै. दिव्य मराठीच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले.
550 दिंड्या
राज्यभरातून नाथषष्ठी उत्सवात सहभागी झाल्या आहेत.
काल्याच्या दहीहंडीचा वाद कोर्टात : काल्याची दहीहंडी १५ मार्चला फोडली जाईल. नाथांच्या वाड्यात ती फाेडावी, अशी वंशजांची मागणी आहे. मात्र ती बाहेरील डोममध्ये फोडावी, असे संस्थानचे मत आहे. वादावर आज कोर्टात निर्णय होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.