आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था:अल्तमश कॉलनीतील मंगल कार्यालय शाळेच्या ताब्यात; एकही वर्ग भरला नाही

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्तमश कॉलनी परिसरात मनपाची एक नंबर शाळा आहे. त्यालगतच मनपाने भव्य ३ मजली इमारत उभारून मंगल कार्यालयासाठी (शादीखाना) दिली होती. त्यातून मनपाला वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न मिळत होते. परंतु, मनपाने २०२१ मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कारण दाखवून इमारत ताब्यात घेतली. तेव्हापासून या इमारतीत कोणताही वर्ग भरला नाही. तसेच परिसरातील नागरिकांना लग्न समारंभासाठी असलेला एकमेव हॉलही दिला नाही. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे मनपाला मिळणारे उत्पन्नही एका वर्षापासून बंद झाले आहे.

अल्तमश कॉलनीत मनपाची एक नंबर शाळा असून त्यात बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अब्दुल हमीद हॉल शिक्षण विभागाकडे पत्र पाठवून ताब्यात घेतला होता. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे चोरट्यांनी लंपास केले आहेत. या परिसरात गरीब लोक राहतात. त्यांना लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमासाठी खासगी सभागृह भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे मनपाने या इमारतीमधील सभागृह पुन्हा भाडेतत्त्वावर द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खासगी सभागृह न परवडणारे
मनपाचे हॉल परवडणारे आहेत. येथे वर्षभर कार्यक्रम होतात. सभागृह बंद केल्याने महागडे खासगी सभागृह परवडत नाही.- वाहेद खान, रहिवासी

हा तर आमच्यावर अन्याय
गरजूंसाठी मनपाने हॉल बांधला आहे. त्याचा योग्य वापर होत होता. परंतु, हे शाळेने ताब्यात घेतल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. - कलंदर खान, रहिवासी

गरज नसताना सभागृह ताब्यात
शाळेच्या इमारतीत १८ वर्गखोल्या आणि एक ऑफिस आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत ४५०, तर बालवाडीत ७० विद्यार्थी आहेत. तरीही शाळेने सभागृह का ताब्यात घेतले याचे उत्तर त्यांनी द्यावे. - रफिक खान सामाजिक कार्यकर्ते

अहवाल पाठवल्यास निर्णय घेऊ
मनपाने हे सभागृह नागरिकांसाठी बांधले आहे. शाळेने मागणी केल्यामुळे दिले. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार शादीखानाबाबात निर्णय घेण्यात येईल. - अपर्णा थेटे, उपायुक्त, मनपा

बातम्या आणखी आहेत...