आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळी चोरी:आकाशवाणी चौक, सिडकोतून मंगळसूत्र हिसकावले; मोफत गहू, तांदूळ देण्याच्या आमिषाने वृद्धेचे मंगळसूत्र काढून घेत तरुणाचा पोबारा

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनसाखळी चोरी, रस्त्यांवर खोटे बोलून लूटमारीच्या वाढत्या घटनांमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कडेकोट नाकेबंदी लावली. मात्र, गुरुवारी संध्याकाळी आकाशवाणी चौकापासून काही अंतरावर दुचाकीस्वार चोरांनी महिलेच्या गळ्यातील बारा ग्रॅमचे मंगळसूत्र, तर त्याच्या दीड तास आधी सिडको परिसरात वृद्धेला किराणा सामान देण्याचे आमिष दाखवून तीन ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले.

न्यू शांतिनिकेतन कॉलनीतील प्रतिभा सुनील राठोड (३८) या गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता आकाशवाणी चौकातील मॉलमध्ये जाण्यासाठी पायी निघाल्या. त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी रस्त्यावर मुख्य बाजारपेठेत विरुद्ध दिशेने दाेन दुचाकीस्वार आले. त्यांच्याजवळ जाऊन दुचाकीचा वेग कमी करत मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील बारा ग्रॅम मंगळसूत्र हिसकावले व चौकाच्या दिशेने पोबारा केला. त्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नाकेबंदीचा फायदा शून्य : शहरात खोटे बोलून फसवणूक करणे, चोऱ्या वाढल्याने वरिष्ठांनी कडेकोट नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. सकाळी-संध्याकाळसह पहाटे तीन-चार वाजतादेखील नाकेबंदीचे आदेश दिले. पोलिस निरीक्षकांसह ठाण्यातील अर्धेअधिक कर्मचारी, अधिकारी तैनात करण्याच्या सूचना केल्या. दोन-अडीच तास नाकेबंदी करूनही लूटमारीच्या दोन घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कासाबाई बालू कोरडे (५०, रा. टाऊन सेंटर, सिडको) या गुरुवारी दुपारी तीन वाजता एमजीएम परिसरातून किराणा सामान आणण्यासाठी पायी जात होत्या. त्या वेळी अंदाजे तीस वर्षीय तरुणाने त्यांना थांबवले. आमचे साहेब गरिबांसाठी मोफत गहू, तांदूळ व पैसे वाटत असल्याचे सांगून सोबत चालण्यास सांगितले. कासाबाई यांच्या हाताला धरून त्याने सेंट्रल नाका भागात नेले. तेथे सोने दाखवावे लागेल, असे सांगून गळ्यातील मंगळसूत्र काढून माझ्याकडे द्या, असे म्हणत कासाबाईचे दागिने घेतले व आत जाऊन येतो, असे म्हणत पोबारा केला. थोड्या वेळाने कासाबाईंना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. एन-६ परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करून दांपत्य तेथेच राहतात.

बातम्या आणखी आहेत...