आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटवले:मनपाने 15 ठिकाणचे अतिक्रमण हटवले ; अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास सूचना

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी 15 अतिक्रमणे हटवली. यात रशीदपुरा, शताब्दीनगर, ज्युबिली पार्क, घाटी परिसरातील अतिक्रमणांचा समावेश आहे.

शताब्दीनगर परिसरात ऐतिहासिक दरवाजाजवळील १२ बाय १५ जागेमध्ये पत्रे टाकून लोखंडी शटर बसवले होते. किरकोळ साहित्य विक्री करण्यात येत होती. या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास सूचना देण्यात आल्या. संबंधितांनी बांधकाम काढले नव्हते. त्यामुळे अतिक्रमण पथकामार्फत कारवाई करण्यात आली.

ज्युबिली पार्क, घाटी परिसर या ठिकाणी काही नागरिकांनी लोखंडी शटर बसवून टपऱ्या टाकल्या होत्या. काहींनी चारचाकी हातगाड्या लावून अतिक्रमण केले होते. या सर्व अतिक्रमणधारकांविरुद्ध जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन लोखंडी टपऱ्या व किरकोळ साहित्य जप्त करून दंड आकारण्यात आला आहे. ज्युबिली पार्क रस्त्यावर पाच बाय पाच आकारामध्ये शेड टाकून दुकाने थाटली होती. ती निष्कासित करण्यात आली आहेत.बीबी का मकबरा रोड, पहाडसिंगपुरा या ठिकाणी शेळके यांचे अनधिकृतपणे दुकानाचे बांधकाम सुरू होते. बांधकाम थांबवून संबंधितांना नोटीस दिली आहे. वाहतुकीला अडथळा करणारे आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध कारवाई नेहमीच सुरू राहील, असे अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र निकम यांनी सांगितले. अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी व मनपा पोलिस पथक यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.