आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:स्थानिक पातळीवर व्यवसायाच्या अनेक संधी; गरज भासल्यास सर्वतोपरी मदत करू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक पातळीवर दुग्धव्यवसाय, ब्यूटी पार्लर, खाणावळ, चहा व वडापाव विक्री, मिठाई, पाणीपुरी, फळे-भाजीपाला, कापड विक्री अशा लहान व्यवसायाच्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्स्पोर्ट करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मी पाटील, देशमुख, वतनदार आहे.. मला हा व्यवसाय करणे शोभणार नाही अशी भूमिका घेऊ नका. कोण काय म्हणेल याची लाज बाळगू नका. कोणताही लहान-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे या. तुम्हाला काही अडचण असेल तर आम्ही सर्व मदत करू, अशी ग्वाही मराठा बिझनेस नेटवर्कच्या बैठकीत यशस्वी उद्योजकांनी दिली.

गोरगरीब मराठा युवक, तरुण-तरुणींना उद्योग-व्यवसायात आणण्यासाठी रविवारी ही बैठक झाली. समाजातील यशस्वी उद्योजक व व्यावसायिक तरुणांचा गौरव करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष अवधूत शिंदे, विजय काकडे पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रकल्पप्रमुख पूजा तांबेकर, तसेच राज्यभरातील उद्योजक उपस्थित होते.

पुरस्काराचे २५ लाख रु. समाजाला देणार : रमेश मुळे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेश मुळे म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी ११ कोटींची देणगी दिली आहे. याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केली आहे. ही २५ लाख रुपयांची रक्कम मिळाल्यावर ती मराठा समाजाला देईल.

बातम्या आणखी आहेत...