आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:बालवैज्ञानिकांनी सादर केले अनेक नवे प्रयोग ; सेल्फी काढण्याचा घेतला आनंद

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छावणी येथील होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला भरारी देण्याचे कार्य शिक्षकांनी केले. बालवैज्ञानिकांनी एकापेक्षा एक उत्कृष्ट प्रयोग सादर करुन उपस्थितांना चकित केले. शनिवारी शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रदर्शनात २४० मुलांनी ६० प्रयोगांचे सादरीकरण केले. यामध्ये हवामानातील बदल, पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, मूलभूत सुविधांसंदर्भात विद्यार्थीनिर्मित कल्पक प्रात्यक्षिक तयार करण्यात आले होते.

विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थी प्रयोगाचे महत्त्व, तयार करण्याच्या पद्धती आणि वापरावर सोप्या शब्दांत आलेल्यांना माहिती देत होते. पाणी बचतीवर तयार करण्यात आलेले नमुने पाहताना पालकही आश्चर्यचकित झाले होते. पालकांनी मुलांनी तयार केलेल्या नमुन्यांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. या प्रदर्शनासाठी सिस्टर सिंथिया यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर जिनी, प्रदर्शनप्रमुख बबिता गुप्ता, महेश श्रीसुंदर, सुजन जेकब, केनथ डिसुझा, रश्मी जोशी, मेरी थॉमस, समीक्षा बैस यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...