आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दीड महिन्यापासून शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत होता. आता प्रत्येक पंप एक-दोन दिवसांआड बंद राहत आहे. गुरुवारी (२ जून) दुपारनंतर अनेक पंपांवर इंधन संपल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. इंधन कंपन्यांना लिटरमागे २० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने त्यांनी भाव वाढवण्याची मागणी केली आहे. केंद्र शासन त्यास परवानगी देत नसल्याने कंपन्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. शहरात गुरुवारी टीव्ही सेंटर रोडवरील पोलिस पेट्रोल पंप, एन-७ पेट्रोल पंप, जकात नाका येथील मनपाचा पेट्रोल पंप, शिवाजीनगरातील पंप बंद होते. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने अनेकांना ती ढकलत न्यावी लागली. रिक्षाने गाठले ऑफिस : संध्या देशमुख म्हणाल्या, ऑफिसला जाताना मी पोलिस पंपावर पेट्रोल भरते. पण आज पेट्रोल मिळाले नाही. त्यामुळे एन- ७ येथे गेले. पण तिथेही हीच परिस्थिती होती. शेवटी गाडी पंपाजवळ लावून रिक्षाने ऑफिस गाठण्याची वेळ आली. मुकुंद राठोड म्हणाले, मी सकाळपासून ४ पंपांवर गेलो. पेट्रोल नाही म्हणून परत फिरावे लागले. जकात नाका पंपावरही पेट्रोल न मिळाल्याने मी सेव्हन हिल्स पंपापर्यंत जाऊ शकलो. पण ज्यांच्या गाड्यांत कमी पेट्रोल आहे त्यांची अडचण झाली. पेट्रोल तर मिळाले नाहीच, पण असलेले पेट्रोलही संपले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.