आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:औरंगाबाद विभागातील अनेक गावे नुकसान भरपाईपासून वंचित, यंदाच्या पावसामुळे 30 ते 35 गावांचा संपर्क तुटला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 118 पाझर तलावांचे नुकसान, दुरुस्तीसाठी 35 कोटी 89 लाखांची गरज

सरकारने गेल्या दोन तीन वर्षापूर्वी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दिलेली नाही. यंदाही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ३० ते ३५ गावांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, रस्तेवाहून गेलेत तर ११८ कोल्हापूरी बंधारे आणि पाझर तलावांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जि.प. सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यंमत्री जलसंवर्धन योजना कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे बाधित नुकसान भरपाई दिली जाते. मात्र मागील दोन-चार वर्षापूर्वी देखील मोठे नुकसान पावसामुळे झाले त्याचीच नुकसान भरपाई प्रस्ताव सादर करुनही मिळालेली नाही.

तर यंदा म्हणजे २०२०-२१ मध्ये झालेल्या पावसामुळे आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे २१३ पैकी ११८ गावातील कोल्हापूरी बंधारे आणि पाझर, सिंचन तलावांचे नुकसान झाले आहे. त्यातील ९५ कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे, शिवकालीन आणि सिमेंट बंधारेंचा समावेश आहे. आता जि.प. प्रशासनाला एकूण ३५ कोटी ८९ लाख दुरुस्तीसाठी लागणार आहेत. शासनाने आतापर्यंत १२७ कामांना १९.५८ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, निधीसाठी तरतुद केली आहे. तर प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांकडे २१३ प्रस्ताव सादर केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

नव्या नियमांमुळे अडचणीत वाढ
निधी मंजूर झाला तरी तो मिळण्यासाठी अडचणी असतांनाच दुरुस्ती करण्यातही अडथळे निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे कारण आतापर्यंत नुकसान झाल्यास जि.प. प्रशासनाच्या वतीने त्या त्या विभागातील अधिकारी पाहणी करून प्रस्ताव सादर करत असे. परंतु शासनाने १७ फेब्रुवारी २०२१ रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार दुरुस्तीची जबाबदारी मृद आणि जलसंधारण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. अॅक्टमध्ये प्रोव्हिजन असतांना देखील या बदलामुळे आणि नियमामुळे अडचणी निर्माण झाल्याचेही जि.प. अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अतिवृष्टीमुळे ३० ते ३५ गावांमधील संपर्क तुटला आहे. रस्ते वाहून गेले आहेत. ज्या प्रमाणे शहरातील रस्त्यांसाठी निधी दिला जातो. तशीच तरतुद ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी असावी. - किशोर बलांडे जि.प. बांधकाम सभापती

बातम्या आणखी आहेत...