आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:आज सरकारयुक्तिवाद करणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची करणार मागणी : अशोक चव्हाण

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता आजचाच दिवस हाती, काय जोर लावायचा तो लावा : खा. संभाजीराजे

मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमाेर सुनावणी न घेता ती घटनापीठासमाेर (लार्जर बेंच) घ्यावी, अशी मागणी राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकारकडून युक्तिवाद केला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर चव्हाण यांनी आैरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या पीठासमोर यापूर्वीच सुनावणी झाली आहे. त्यामुळे मंगळवारची सुनावणी पुन्हा त्याच पीठासमोर हाेणे राज्य सरकारला मान्य नाही. घटनापीठासमाेर हा विषय गेला पाहिजे. मागच्या सुनावणीच्या वेळी न्या. नागेश्वर राव व इतर दोघांसमोर सुनावणी झाली. यात कायदेशीर विषय आहेत, त्यामुळे ते घटनापीठासमाेरच गेले पाहिजेत. या खटल्यातील इतर याचिकाकर्त्यांचीही हीच भूमिका आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

आता उद्याचाच दिवस हाती, काय जोर लावायचा तो लावा : खा. संभाजीराजे

जालना | मराठा आरक्षणासाठी मंगळवारचा दिवस हातात आहे. सरकाराने जेवढा जोर लावायचा तेवढा लावावा. नंतर कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देणे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. सरकारने ती पाळलीच पाहिजे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले.

सरकार आपल्या भूमिकेवर ठाम

चव्हाण म्हणाले, ‘मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नव्हती त्या वेळीही आम्ही एकमताने मराठा आरक्षण कायद्याला सहमती दिली हाेती. त्या वेळेस आमची जी भूमिका हाेती तीच आजही कायम आहे. सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण नाही.’

मराठवाड्याच्या रस्त्यांना ५४२ कोटी

‘अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील रस्त्यांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीपाेटी ५४२ कोटींची मदत दिली जाईल. राज्यातल्या रस्त्यांसाठी सरकार लवकरच एडीबीकडून १५ हजार कोटींचे कर्ज काढणार आहे. त्यामध्येही मराठवाड्याला झुकते माप दिले जाईल,’ असे चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...