आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:समाजाच्या नावाने दलाली करणाऱ्यांना लवकरच बंदोबस्त करणार, मराठा समन्वयकांचा इशारा

औरंगाबाद25 दिवसांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यावर मशाल मोर्चा काढणार असल्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ४ नोव्हेंबर रोजी काही समन्वयकांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे शेकडो मराठा समन्वयक संतप्त झाले असून हा मोर्चा भाजप पुरस्कृत आहे. सकल मराठा समाजाला राजकारण अजिबात करायचे नाही. मराठा समन्वयकांचा याच्याशी तीळमात्र संबंध नाही. त्यामुळे दोन तीन जणांनी एकत्रित येऊन समाजाच्या नावाने राजकर्त्यांची दलाली करणे बंद करावे, अन्यथा त्यांना समजेल त्या भाषेत सर्व समन्वयक एकत्रित येऊन बंदोबस्त करणार असल्याचे सर्व समन्वयकांच्या वतीने रविंद्र काळे पाटील यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून शांततेत मोर्चे काढले आहेत. सरकारने वेळोवेळी खोटी आश्वासने दिलीत. त्यामुळे घोर फसवणूक झाली आहे. एवढच नव्हे तर तरुण ४२ मुलांनी आत्मबलिदान दिले. शेकडो जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे समाजात राज्य बरोबर केंद्र सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, संपुर्ण समाजाच्या नावाने दोन तीन समन्वयकांनी एकत्रित येणे व राजकीय हस्तक होऊन मातोश्रीवर आंदोलन करण्याचा इशारा देणे अयोग्य आहे. ज्याना आंदोलन करायची त्यांनी खुशाल करावित, प्रत्येकांनी स्वत:च्या संघटना काढलेल्या आहेत, त्या बॅनरचा उपयोग करावा, समाजाच्या नावाने राजकीय दलाली खपून घेतली जाणार नाही. मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चातील ९९.९९ टक्के समन्वयकांचा या आंदोलनाशी कोणताच संबंध नाही. जे कुणी दोन चार समन्वय संपूर्ण समाजाच्या नावाने गोरख धंदे, घाणेरडे राजकारण करून बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत, त्यांना धडा शिवणार असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले. तसेच या विरोधात मराठा क्रांती मोर्चा मराठा समन्वयकांनी मोट आवळण्यास सुरुवात केली असून समाजाच्या नावाने दलाली करणाऱ्यांचे गोरख धंदे उघड करणार असल्याचेही काही समन्वयकांनी इशारा दिला आहे.

७ नोव्हेंबर रोजी पंढरपुर ते मंत्रालय मोर्चा

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पंढरपुर ते मंत्रालय पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. २१ व्या दिवशी हा दिंडी मोर्चा मंत्रालयावर पोहोचणार आहे. त्यातही जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला प्रमुख एक समन्वयक सोडला तर उर्वरित कुणीच हजर नव्हते.

भाजप पुरस्कृत का?

भाजप पुरस्कृत शिवसंग्राम संघटनेचे विधान परिषद आमदार विनायक मेटे यांनी मशाल मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा सहभागी होत असल्याचे केरे व त्यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतून केले. त्यामुळे हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा मोर्चा राजकीय प्रेरीत असून याच्याशी सकल मराठा समाजाचा व मराठा समन्वयकांचा काडीमात्र सबंध नसल्याचे काळे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट करून मातोश्रीवरील मशाल मोर्चाची हवा काढून टाकली आहे.