आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याची टाळाटाळ थांबवावी:मराठा क्रांती मोर्चाची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्याकडे मागणी

संतोष देशमुख|औरंगाबाद|24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मराठा बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज परतावा योजना लागू केली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार तरूण अर्ज करतात. मात्र, राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. यामुळे रोष वाढत चालला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सोमवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजातील भूमिहीन, कष्टकरी, अल्प व उच्चशिक्षित बेरोजगार तरूण, तरुणी, शेतकरी महिला, शेतकरी गटांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांना पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवण्यासाठी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. वैयक्तिक व्याजज पतावा योजना, गट कर्ज व गट प्रकल्प व्याज परतावा, अशा तीन कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी महामंडळावर सोपावली आहे. प्रति उद्योग, व्यवसायासाठी १० लाख रुपययांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे धोरण जाहीर केले आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे व्याज परतावा शासनाकडून देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक कर्ज परतावा योजनेला उत्तम प्रतिसाद मिळात आहे. पण लाभ अत्यल्प बेरोजगारांना मिळतोय. त्यामुळे रोष वाढत चालला आहे.

बँकासोबत बैठक घ्यावी

केंद्रिय अर्थराज्य मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्याज परतावा तीन योजनेतंर्गत कर्जासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर हजारो बेरोजगार मराठा तरुणांना कर्ज का दिले जात नाही? टाळाटाळ का केली जाते, असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपस्थित करून केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे लक्षवेधले व थेट तक्रार करण्यात आली.

राष्ट्रीयकृत बँकासोबत आमची बैठक घ्यावी व मागेल त्यांना विनाविलंब उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावे, अशी आग्रही मागणी मुख्य समन्वयक विनोद पाटील, अभिजित देशमुख, प्रा. चंद्रकांत भराट, रेखा वाहटुळे, सुकन्या भोसले, सुनील कोटकर पाटील, सुवर्ण मोहिते, निलेश ढवळे पाटील, गणेश उगले पाटील, आदींनी केली व मागणीचे निवेदन दिले. यावर डॉ. कराड यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

अध्यक्षविना महामंडळ

अडीच वर्ष पूर्ण होत आहेत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा कारभार अध्यक्षविना सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...