आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारले, काळे फासले:औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चातर्फे तीव्र निदर्शने, पदावरून हटवण्याची मागणी

प्रतिनिधी । औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्यास अभिवादन करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपालांचे चित्र असलेल्या पोस्टर्सवर काळी फुली मारून ते पायाने तुडवून, काठीने मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

शिवद्रोही राज्यपालांना त्वरीत हटवावे, अन्यथा राजजभवानावर मोर्चा धडकणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला आहे.

राज्यपालांना हटवा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षेपार्ह विधान केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी त्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. औरंगाबादेतील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून महाराजांबद्दल सतत अपशब्द बोलणाऱ्या राज्यपालांना त्वरीत हटवा, अशी मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आले.

प्रतिमेस काळे फासले

राज्यापालांच्या पोस्टर्सवर असलेल्या प्रतिमेस काळे फासून चप्पल जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अशा प्रकारे राज्यपालांविरोधात संताप व्यक्त होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. याला पंतप्रधान मोदी सरकार जबाबदार असल्याची प्रखर टिका आंदोलकांनी केली आहे. राज्यपालांच्या प्रतिमेवर चप्पल, बुटांचा वर्षाव होत असताना पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांची संख्या जास्त होती.

सरकारला इशारा

आंदोलनात मराठा समन्वयक व पोलिस यांच्यात जोरदार संघर्षही बघायला मिळाला. आंदोलक राज्यपालांना हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. याची तातडीने अंमलबजावणी भाजप सरकारने केली नाहीतर उद्या जो उद्रेक होईल, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे अन् फडणवीस सरकार जबाबदार राहील, असा निर्वाणाची इशारा संतप्त आंदोलकांनी दिला आहे. तसेच राज्यभवनावर मोर्चा धडकणार असल्याचेही त्याचे सांगितले. आंदोलनात चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, निलेश डव्हळे, नंदू गरड, गणपत म्हस्के, रमेश गायकवाड, गणेश उगले, सचिन मिसाळ, राजकुमार पवार, कल्याण शिंदे, रेखा वाहटुळे, पंढरीनाथ गोडसे, ज्ञानेश्वर गायकवाड, रविंद्र वाहटुळे, अनिकेत शिंदे, किरण काळे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

भाजपचा सत्तेचा माज उतरवणार

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील कोटकर म्हणाले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. त्यांच्याच पाठिराख्यामुळे शिवद्रोही राज्यपाल वारंवार थोर महापुरूषांचा अनादर करत आहेत. मात्र, आम्ही शिव, शाहु, फुले, आंबडेकरांचे वारसदार कदापी खपून घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात धडा शिकवू. सत्तेचा माज उतरवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...