आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:पुरातत्त्व विभाग, भाजपच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने केली निदर्शने

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा किल्ल्यात साजरी करण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी क्रांती चौकात निषेध करण्यात आला. पुरातत्त्व प्रशासन आणि सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात त्यांनी निदर्शने केली.

औरंगाबादेतील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा किल्ल्यात साजरी करण्याची परवानगी द्यावी, यासाठी संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील ११ नोव्हेंबरपासून पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांना परवानगी नाकारण्यात आली. आग्रा किल्ल्याशी ऐतिहासिक संबंध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली, असा प्रश्न अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. सुनील कोटकर, रमेश गायकवाड, अप्पासाहेब कुढेकर पाटील आंदोलनात सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...