आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा संसदेवर धडकणार; राजेंद्र दाते आणि किशोर चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • सर्व प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाज आरक्षण मिळवणारच
  • खंडपीठाकडे सबळ पुरावे सादर करून सक्षमपणे बाजू मांडण्याची तयारी पूर्ण

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सबळ पुरावे सादर करून विधी तज्ज्ञ सक्षमपणे बाजू मांडणार आहेत. त्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास वाटतोय. असे असले तरी मराठा आरक्षण टिकावे, यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची आम्ही तयारीच केली आहे. केंद्र सरकारने संसदेत निर्णय घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवणे नितांत गरजेचे आहे. या प्रमुख मागणीसाठीच हिवाळी अधिवेशन काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे समन्वयक तथा हस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली. तोवर न्यायालयीन निर्देशाप्रमाणे ईडब्ल्यूएस आरक्षण राज्य सरकारने लागू केले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त झाले आहे. पण हा विषय ऐच्छिक ठेवावा. मॅनेजमेंट कोटा शासनाने स्वतःकडे ठेवून सर्व प्रवेश निश्चित करावे. प्रवेश श्रेणी मध्ये दुरुस्ती करण्याची मुभा द्यावी. १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही. राज्य स्वतच्या अधिकारात कोणत्याही समाजाला आरक्षण देवू शकते. केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. त्यामुळे जो घोळ सुरु आहे त्याला आता विराम लागेल. दुता मार्फत केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे शिफारशीसह पत्र पाठवून राज्य सरकारने स्पष्टीकरण घ्यावे व सर्वोच्च न्यायालयात ते सादर करावे, यासह सबळ पुरावे विधी तज्ज्ञांना दिले आहेत. त्यामुळे स्थगिती उठेल. त्यानंतर ईडब्ल्यूएस आपोआप रद्द होईल. अशी माहिती राजेंद्र दाते पाटील यांनी दिली. तर केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबत अलिप्त भुमिका घेत आहे. त्यांची भूमिका महत्त्वाची असून आरक्षणाची मर्यादा वाढवून हा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढणे गरजचे आहे. या प्रमुख मागणीसाठी हिवाळी संसदीय अधिवेशन काळात मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील सकल मराठा समाजाला सोबत घेऊन संसदेवर धडकणार असून जोवर समाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे किशोर चव्हाण यांनी सांगितले. हे आंदोलन शेतकरी आंदोलनाच्या तोलामोलाचे असेल.

सरकारने ठोस पाऊल उचलले नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देखील दिली. या वेळी डॉ. शिवानंद भानुसे, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे पाटील, मनोज गायके, सतीश वेताळ, प्रभाकर मते, रेखा वाहटुळे, शिवाजी जगताप, अंकत चव्हाण, सुकन्या भोसले, मनीषा मराठे, निर्मला मते, रविंद्र वाहटुळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समन्वयक उपस्थित होते.

मंत्र्यांनी उगाच वाद वाढवणे बंद करावे

न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालेले आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण घ्यायचे तर घ्या असे बेभान बोलून वाद वाढवू नये. सामाजिक शांतता भंग होणार नाही, असे कृत्य मंत्र्यांनी करणे शोभा देत नाही, अशी खरपुस टिका ज्येष्ठ समन्वयक किशोर चव्हाण यांनी केली. तसेच ओबीसी नेत्यांचा एसईबीसी मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्रीय ओबीसी आरक्षणाची मर्यादा२७ टक्केच आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवणे अनिवार्य असल्याने हिवाळी अधिवेशनात त्यावर सर्वानुमते निर्णय व्हावा, यासाठी महाराष्ट्रात जसे ५८ मोर्चे काढले तसे आता संसदेवर एकच लक्षवेधी मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...