आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा मोर्चा:मराठा क्रांती मोर्चातर्फे आता 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा, कायगाव टोका येथे करणार आंदोलन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा क्रांती मोर्चातर्फे आता 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कायगाव टोका येथे उद्या म्हणजेच 23 जुलै रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली. मराठा बांधवांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. विशेषतः 42 मराठा बांधवांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केले जात आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलेलं होते. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. 42 मराठा बांधवांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांना काहीच मदत झाली नाही. यामुळे हे आंदोलन केले जाणार आहे. असं सांगत क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

मराठी क्रांती मोर्चाने अनेक आंदोलने केली आहेत. दरम्यान यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणानं औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथे जलसमाधी आंदोलनात जलसमाधी घेतली होती. आता या ठिकाणीच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 42 जणांच्या कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होतील. त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी ही मुख्य मागणी यामध्ये राहणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहे.

दरम्यान कायगाव टोका येथे होणाऱ्या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. पोलिसांनी या आंदोलनासाठी मोठी तयारी केली. पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले तरी आंदोलनावर मराठा क्रांती ठोक मोर्चा ठाम असल्याचं रमेश केरे पाटील यांनी सांगितलं आहे.