आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत लक्षवेधी निदर्शने आंदोलन, पोलिस व मराठा समन्वयकांत बाचाबाची; आंदोलन मोडून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न

संतोष देशमुख | औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सरकार शब्द पाळत नाही म्हणून निषेध व्यक्त करत असल्याचे समन्वयकांनी सांगितले

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी सकाळी 10.30 वाजेपासून क्रांती चौकात लक्षवेधी निदर्शने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी पोलिस व मराठा समन्वयक यांच्यात काही वेळ बाचाबाची धरपकड देखील झाले होती. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न झाला. मात्र, आंदोलकांचा ठोस भूमिकेमुळे पोलिस कारवाई कुचकामी ठरली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ठिय्या, निदर्शने आंदोलन सुरू राहणार असल्याचे मराठा समन्वयकांनी सांगितले आहे.


आंदोलकांच्या मागण्या

 • मराठा आरक्षण पुढील आवाहन आजही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने ठोस भूमिका मांडावी.
 • आरक्षणासाठी आत्मबलिदान देणाऱ्या 42 तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी. एकाला नोकरीत सामावून घ्यावे.
 • आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळास 500 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा.
 • कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी.
 • क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावे.
 • वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावावा
 • कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदेंच्या स्मारकासाठी पाच एकर जागा मिळावी
 • आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या 47 विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घ्यावे जे आरक्षण नाकारल्याने आज घरी असून हाल अपेष्टाचे जीवन जगत आहेत.
 • सारथी योजना सक्षम करून प्रत्यक्ष प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी
 • 13700 मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावे

अशा विविध मागण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील, आप्पासाहेब कुढेकर पाटील, राहुल पाटील मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुणांनी ठिय्या निदर्शने आंदोलनात सहभाग घेतला होता.

पोलिस आणि समन्वयकामध्ये बाचाबाची

कोरोना संसर्ग प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत गर्दी करणे धोक्याचे आहे. असे असताना शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चा आणि शनिवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. दोन्ही आंदोलनात पोलिस व मराठा समन्वयकात बाचाबाची झाली. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून पाहिला. मात्र, आंदोलक आंदोलनाच्या भुमिकेवर ठाम राहिल्याने काल व आज दोन्ही आंदोलन लक्षवेधी ठरले आहेत.

समाजासाठी आंदोलन

मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा मध्ये कोणतेही मतभेद नाहीत. समाज कल्याण हाच आमचा एकमेव ध्यास आहे. वेगवेगळ्या आंदोलनाचे नुकसान शून्य व फायदे अनेक असल्याचे मराठा समन्वयकांनी स्पष्ट केले.

सरकार शब्द पाळत नाही म्हणून निषेध व्यक्त करत असल्याचे समन्वयकांनी सांगितले

मराठा तरुणांनी आझाद मैदानावर उपोषण आंदोलन केले. मंत्र्यांनी मराठा आरक्षण, शिष्यवृत्ती, कुटुंबीयांना आर्थिक मदत आदी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कृती शून्य असल्याने तिकडी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...