आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांच्या पुतळ्याने केले आंदोलकांचे संरक्षण:विविध मागण्यांसाठी तिसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन; पोलिसांचा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न फसला

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

सोमवारी तिसऱ्या दिवशी मराठा समन्वयकांनी अर्धनग्न होऊन निदर्शने आंदोलन केले. पोलिसांचा फौजफाटा आंदोलन मोडून काढण्यासाठी आला होते. पण आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांच्या मधोमध लाकडाच्या खुर्चीवर ठेवला. काहींनी ती खुर्ची घट्ट पकडून ठेवली होती. पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर, पुतळा खाली पडून सामाजिक शांतता भंग झाली असती. तसेच आम्ही हक्कासाठी आंदोलन करतोय, हा गुन्हा आहे का ? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित करून पोलिस अधिका-यांना कोंडित पकडले. यामुळे आंदोलन गुंडाळण्यासाठी आलेले तीन वाहनातील पोलिस खाली हात परत गेले.

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने सुरक्षेसाठी काही नियम व अटी लादून व्यवहार, कामकाज करण्यास परवानगी दिली आहे. कार्यक्रम, सोहळे एकत्रित येऊन गर्दी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. बळाचा वापर करून पाहिला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ७ आॅगस्ट रोजी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तेव्हा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद आंदोलकांवर चांगलेच भडकले होते. तर ८ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या निदर्शने सुरू केले. पहिल्या दिवशी पोलिस आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती. ९ आॅगस्टला जागर गोंधळ आणि आज कपडे काढून उघडे होऊन निदर्शने आंदोलन करण्यात आले. याची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दोन वाहनात स्पेशल फोर्स, एक वाहनात पोलिस अधिकारी आले होते. आंदोलकांना चहुबाजूंनी घेराव घातला होता. पण आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांच्या मधोमध ठेवला. त्याला काही समन्वयकांनी पकडून ठेवले होते. आमच्या सोबत शिवराय पण येतील. तसेच समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का? ज्यांच्या मुलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वत:चे आत्मबलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. ते आज आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. घरात मेल्या पेक्षा रस्त्यावर उतरून मरण पत्करून शहीद होऊ. नाहीतर सरकारने तातडीने न्याय द्यावा. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. बळाचा वापर सत्तेचा गैरवापर करून आंदोलन मोडून काढण्याचा कुणी प्रयत्न करू नये. अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. तसेच पोलिसांच्या सलग आंदोलन मोडून काढण्याचा भुमिकेचा एक मराठा लाख मराठा आणि सरकरचा निषेध आशा घोषणा देऊन तीव्र शब्दांत निषेध केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत व ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...