आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी विविध नेत्यांकडून मागणी होत आहे. मुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायला ओबीसी समाजाचा विरोध नाही.
मात्र, त्यासाठी ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने आरक्षण द्यावे. ओबीसीतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा ओबीसी समाजातील मान्यवरांनी दिला. ओबीसी समाजातील समस्या, मागण्यांच्या संदर्भात गुरुवारी हडको एन-12 येथील संत सेना भवनात विचारवंतांची राज्यस्तरीय बैठक झाली.
अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर होते. या वेळी बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, डॉ. राजेंद्र कुंभार, श्रावण देवरे, विष्णू वखरे, संदीप घोडके आदींची उपस्थिती होती. ओबीसीच्या प्रश्नावर मत मांडताना डॉ. कुंभार म्हणाले की, एस्सी-एसटी प्रवर्गाला संरक्षण आहे, परंतु ओबीसी प्रवर्गाला नाही. त्यामुळे ओबीसींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या पध्दतीने लोहार, कुंभार समाजाचे व्यवसाय बंद पडले त्या पध्दतीने इतरही व्यवसाय बंद पडत आहेत. आज खऱ्या अर्थाने लोकांना एकत्रित जोडण्याचे काम व्हायला पाहिजे. सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक कार्यक्रम घेतले पाहिजेत. ओबीसी समाजाने सांस्कृतिक चळवळ उभी करून ओबीसी इतिहास संशोधन समिती करावी.
ओबीसी समाजाच्या बैठकीत प्रा. डॉ. लुलेकर, कल्याण दळे, डॉ. राजेंद्र कुंभार आदी.आम्ही आमचा वाटा देणार नाही : दळे दळे म्हणाले की, मराठा समाजाने ओबीसीतून मागणी करू नये यासाठी विविध ठिकाणी मेळावे घेतले जातील. आम्ही आमचा वाटा कोणाला देणार नाही, नसता रस्त्यावर उतरू असे सांगितले. बैठकीत लाड समाज, राष्ट्रीय चर्मकार संघ, महात्मा फुले समता परिषद, सत्यशोधक महासंघ आदींचे सदस्य, दत्ता राजगुरू, सतीश जयकर, प्रा. साहेबराव पोपळघट, सुवर्णा म्हस्के यांची उपस्थिती होती. या ठिकाणी अमरावती, अहमदनगर, गोंदिया, धुळे, कोल्हापूर, मालवण येथील विचारवंतांची बैठक झाली, तर पुणे, अकोला, नागपूर, सोलापूर या ठिकाणी मेळावे घेण्याचा निर्णय बैठकीत घेतले.बैठकीत सर्वानुमते घेण्यात आले हे ठराव महाराष्ट्र विधानसभेने ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेबाबत केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी.
सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रवर्गातील सेल, आघाडी हे शब्दप्रयोग बंद करावेत. विधानसभा, लोकसभामधील ओबीसींचे आरक्षण द्यावे, सर्व मंदिरामध्ये बहुजन समाजाला संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे. बहुजन- ओबीसी लोक, दैवतांच्या स्थळांना तीर्थस्थानांचा दर्जा द्यावा . शिवाय तेथे बहुजन समाजातील पुजारी नेमण्यात यावे. ओबीसी-बहुजन महापुरुषांचा गड उभा करण्यात यावा, नव्या संसद भवनाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रद्द करून सर्वांना समान शिक्षण अर्थात मोफत शिक्षण द्यावे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.