आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Maratha Reservation | Marathi News | Today Maratha Kranati Morcha Azad Maidan Mumbai | Marathi News | Five Thousand Maratha Youth From Marathwada Left For Mumbai For Agitation

छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा:मराठवाड्यामधून पाच हजार मराठा तरुण आंदोलनासाठी मुंबईला रवाना

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे २६ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदाेलनात सहभागी हाेण्यासाठी औरंगाबादमधून १ हजार, तर मराठवाड्यातून ५ हजार मराठा तरुण मुंबइर्कडे रवाना झाले आहेत.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. त्यामुळे गोरगरीब ७० टक्क्यांवर मराठा समाज न्याय हक्कांपासून वंचित राहिला आहे. शेतकरी आत्महत्येपाठोपाठ आता महिला शेतकरी, शैक्षणिक शुल्क, बस पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी आत्महत्या करू लागले आहेत. समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ हजार मराठा तरुण मुंबईला रवाना झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख यांनी सांगितले.

ते म्हणाले की, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा बॅनर बाजूला ठेवून आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहे. तर, संभाजीराजेंच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा या मागणीवर संभाजी ब्रिगेड ठाम असल्याचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...