आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये मराठा समाजाचा एल्गार:...तर पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही; आमदार विनायक मेटेंचा सरकारला इशारा

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयवर मराठा क्रांती संघर्ष मोर्चा

शिवसंग्राम पक्षाचे संस्थसपक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन आज बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलवरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसले, तरी बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज एकवटलेला दिसून आला. या मोर्चात महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दुपारी 1 वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. कोरोना आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने याचे योग्य नियोजन केले होते. मोर्चात आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील, राजन पाटील, रमेश पोकळे यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपसातील मतभेद विसरुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने एकवटलेले दिसून आले.

ही लढाई गरिबांची
या प्रसंगी बोलताना आमदार मेटे म्हणाले की, हा छत्रपतींचा मावळा उगाच कोणाच्या अंगावर येत नाही, पण जर कोणी अंगावर आले तर त्याला सोडत नाही. हे सरकार अंगावर येत आहे, म्हणून हा मराठा माणूस रस्त्यावर उतरला आहे. उद्धवजी तुम्ही जर तात्काळ याकडे लक्ष दिले नाही तर तुमचे पुढील दिवस बरे नाहीत. ही लढाई गरिबांची आहे, श्रीमंतांची नाही आणि हा गरीब आता रस्त्यात आला आहे आणि तुम्ही श्रीमंतांचे ऐकू नका. या ठिकाणी कोणी वाड्यावरील नाहीत, सर्वजण गरीब आहेत. या सर्व गोरगरिबांचा आवाज बनून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

सरकारला लाज वाटली पाहिजे
यावेळी मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मेटे म्हणाल की, अशोक चव्हाण सारखा नालायक आणि नाकर्ता माणूस दुसरा कोणीच नाही. या अशोक चव्हाणच करायचे काय खाली मुंडके वरी पाय अशी घोषणा बाजीही त्यांनी यावेळी केली. तसेच, जोपर्यंत अशोक चव्हाण राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठरवणार, असेही विनायक मेटे म्हणाले.

...तर पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही
मेटे पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आता एकवटने जरुरी आहे. याची सुरुवात आम्ही बीडपासून केली आहे. येत्या 5 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर पावसाळी अधिवेशन होऊ देणार. या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका उद्धवजी. या राज्यात जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील आणि जर सरकार आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मुंबईला मोठा मोर्चा होईल, असेही मेटे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...