आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:दगडोजीराव देशमुख कॉलेजात मराठी भाषा गाैरव दिन साजरा

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. कवी चक्रधर डाके, कार्यक्रमाचे अध्यक्ष मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल वाघ यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मराठी विभागाच्या वतीने बीए द्वितीय वर्षातील आश्लेषा वाडकर या विद्यार्थिनीने तयार केलेल्या “महती मराठीची’ या भित्तिपत्रिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सागर माने, सारिका सूर्यतळ आणि ज्ञानेश्वर तावरे या विद्यार्थ्यांनी “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’, “कणा’, ‘सागर’, “स्वप्नांची समाप्ती’आणि “प्रेम कर भिल्लासारखे’ या कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितेचे वाचन केले. डॉ. वाघ यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. नागेश बोंतेवाड यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...