आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियावर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा म्हणून "मायमराठी'ने झेंडा रोवला आहे. हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांना मागे टाकत व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि फेसबुकचे विश्व मराठी भाषेतल्या पोस्ट आणि व्हिडिओने व्यापले आहे. देशभरात ८ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा मराठी आहे. यापैकी ५.१ कोटी लोक म्हणजेच ६३.७५% लोक सोशल मीडियावर मराठीचा वापर करतात. दुसऱ्या क्रमांकावर हिंदीचा नंबर लागतो. देशभरात ५२ कोटी ८३ लाख लोक हिंदी भाषेचा मातृभाषा म्हणून वापर करतात. त्यापैकी २० कोटी लोक म्हणजेच ३८.६५% लोक सोशल मीडियावर हिंदीतून संवाद साधतात.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्यानुसार लॉकडाऊनच्या काळात देशात डिजिटल साक्षरतेत मोठी वाढ झाली. २०२१ मध्ये देशभरात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या ५३ कोटी, यूट्यूब-४४.८ कोटी, फेसबुक-४१ कोटी, इन्स्टाग्राम- २१ कोटी, तर ट्विटर वापरकर्ते १.५ कोटीच्या घरात आहेत.
व्हॉइस टायपिंग वाढले
मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांत मोबाइलवर ६० टक्के लोकांना ऑपरेटरकडून अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. सर्वाधिक ८० टक्के लोकांना की-बोर्डची तक्रार आहे. इंग्रजीत टाइप करून मराठी भाषा लिहिणे कठीण जाते. शहरी भागात अनेक जण व्हॉइस टायपिंगकडे वळले आहेत. व्हॉइस कमांडचा वापर करून गाणी, सिनेमा शोधले जातात.
पाच वर्षांत दुपटीहून अधिक वाढ
९ भाषांना मागे टाकत मराठीचा डंका
राज्याच्या लोकसंख्येच्या अर्धा हिस्सा म्हणजेच सुमारे ५.१ कोटी मराठी माणूस सोशल मीडियावर मराठीचाच वापर करतो. दुसरीकडे १२ राज्यात हिंदी बोलली जात असतानाही केवळ ३८.६५%लोक सोशल मीडियावर हिंदीचा वापर करतात.
जर्मनीच्या ४ विद्यापीठांत मराठीचे वर्ग
ओटीटीवर मराठी वापरणारे काहीसे मागे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.