आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसवेळा VIDEO:तुझ्या भरोशावरच आम्हाला लागते तहान; प्रख्यात कवी आणि गीतकार दासू वैद्य यांची कविता!

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार दासू वैद्य यांची कविता.

मराठीतले आघाडीचे कवी दासू वैद्य यांनी गीतलेखन, नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य असे विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही केले आहे.

दासू वैद्य यांचे तूर्तास, तत्पूर्वी, मेळा, चष्मेवाली, झुळझुळ झरा, गोलमगोल, क कवितेचा, भुर्र, आजूबाजूला ही पुस्तके प्रकाशित आहेत. आज त्यांचीच ही आगळीवेगळी कविता...

तुझ्या भरोशावरच

आम्हाला लागते तहान

तुझ्यामुळेच संस्कृती

उगवून आलीय या मातीवर

झाडातून पानांना थरथरणं

नद्यांना नागमोडी चालणं

तू शिकवलंस...

बातम्या आणखी आहेत...