आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:मृगाच्या ओढीनं, जीवाची रांगोळी, रानात घातली कोणी; पाहा कवी प्रकाश होळकरांची कविता

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज बुधवारी दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रकाश होळकर यांची कविता.

होळकर हे नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावचे. त्यांनी कामधेनू, गोष्ट डोंगराएवढी, चिनू, जागर, टपाल, टिंग्या, धूळमाती, बाबू बेंडबाजा, सर्जाराजा आणि हरी पाटील यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

प्रकाश होळकर यांचे कोरडे नक्षत्र, मृगाच्या कविता हे कवितासंग्रह प्रसिद्ध झालेत. त्यांचा ना. धों. महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित रानगंधाचे गारुड हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

वास्तवाचे लख्ख भान, मातीशी जोडलेली नाळ ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये. त्यांची आजची कविताही त्याचीच प्रचिती देते.

मृगाच्या ओढीनं

जीवाची रांगोळी

रानात घातली कोणी...

बातम्या आणखी आहेत...