आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसवेळा VIDEO:आभाळ बरसत होतं, करुणा पांघरून, बुद्ध होऊन; आज प्रिया धारूरकर यांची कविता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवयित्री प्रिया धारूरकर यांची कविता.

प्रिया धारूरकर यांचे विदेही, अंगभरून वाहणाऱ्या पान्ह्यातून हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचा घन दाटले स्वर हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे. पहिल्या दोन दशकांमधील मराठी कवितेतील स्त्री जाणिवांना समृद्ध करणाऱ्या त्या एक महत्त्वाच्या कवयित्री आहेत.

तरल संवेदनांना चिंतनगर्भ आशय प्रदान करणारी त्यांची मांडणी लक्षणीय आहे. अनिवार आणि अलवार प्रेमातील समंजसपणा अंतिमतः माणूस म्हणून 'स्व' चा घेतलेला शोध आहे.स्त्री हे अभिव्यक्तीचे स्त्रोत असले, तरी त्यापुढे जाऊन मानवीमूल्य प्रस्थापित करणारी त्यांची कविता आहे. आज 'पाऊसवेळा'मध्ये प्रिया धारूरकर यांची ही कविता...

तू जेव्हा

सर्वधर्म समभावाची

गोष्ट सांगत होता

आभाळ बसरत होतं

करुणा पांघरुण

बुद्ध होऊन

बातम्या आणखी आहेत...