आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:94 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होणार; साहित्य महामंडळ, स्वागत मंडळाच्या बैठकीत निर्णय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑनलाईन संमेलन नाहीच

नाशिक येथील 94 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल, असा निर्णय मंगळवारी साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या चर्चेत एकमताने झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागतमंडळाचे प्रमुख कार्यवाह व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या स्वागत मंडळाचे समितीप्रमुख विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोहाडे, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील आणि सदस्य विनायक रानडे हे संमेलनाबाबत व कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी साहित्य महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयात आले होते.

या भेटीत त्यांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे आणि कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्याशी संमेलनावर चर्चा केली. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ. मात्र, आजच संमेलनाची तारीख सांगणे अशक्य आहे. परंतू संमेलन फार पुढे जाणार नाही. याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून साहित्य संमेलन लवकर घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करू, असेही ठाले पाटील म्हणाले.

ऑनलाईन संमेलन नाहीच
दरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ऑनलाईन संमेलन घेणे स्वागतमंडळाच्या विचाराधीन नसून, साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदी व प्रकाशक विक्रेत्यांना पुस्तक विक्रिचा लाभ घेता यावा तसेच लेखक-वाचकांच्या गाठीभेटी व्हाव्यात अशी साहित्य महामंडळाची व स्वागतमंडळाची निर्विवाद भूमिका आहे. त्यादृष्टीने हे संमेलन नेहमीप्रमाणेच व्हावे असा साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचाही प्रयत्न असल्याचे ठाले पाटील म्हणाले.

४० समित्यांनी केली तयारी
नाशिककरांना हे साहित्य संमेलन घ्यावयाचेच आहे. त्याची सर्व तयारी केली असून ४० समित्यांच्या सहा-सातशे कार्यकत्र्यांनी तयारी पूर्ण केल्याचे जातेगावकर यांनी सांगितले. मात्र संमेलन नाशिककरांसाठी घ्यावयाचे असल्याने त्याचा लाभ साहित्य रसिकांना घेता येईल, अशी साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचीही भूमिका आहे. मात्र संमेलन जेव्हा घेऊ तेव्हा ते उत्तमच घेऊ याचाही पुनरुच्चार जातेगावकर यांनी केला.

८ ऑगस्टला बैठक
नाशिक येथील साहित्य संमेलन आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी साहित्य महांमडळाची नियमीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत १५ सदस्य उपस्थित राहणार असून, यात वार्षिक अंदाजपत्रक, हिशेब, वर्धापनदिन, नाशिक येथील साहित्य संमेलन आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत या संमेलनाविषयी निर्णय होईल असे ठाले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...