आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची तिसरी लाट:मराठवाड्यातील 400 बालरोगतज्ज्ञ संभाव्य तिसऱ्या लाटेत करणार काम; बीड, बुलडाणा, हिंगोली येथील बालरोगतज्ज्ञांना दिले प्रशिक्षण

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालरोगतज्ज्ञ संघटनेकडून मिशन कोविन उदय ही संकल्पना राबवली जाणार आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता पाहता मराठवाड्यातील ४०० हून अधिक बालरोगतज्ज्ञ प्रशासनाला मदत करतील. त्यासाठी भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने तयारी केली आहे. बीड, बुलडाणा व हिंगोली जिल्ह्यांतील बालरोगतज्ज्ञांसाठी नुकतेच दोनदिवसीय प्रशिक्षणदेखील घेण्यात आले आहे.

राज्यात मागील आठ दिवसांत काही जिल्ह्यांमधून कोविड रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता कोविडच्या तिसऱ्या लाटेत बालकांवर त्याचे परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या शासनाकडे उपलब्ध असलेल्या बालरोगतज्ज्ञांची संख्या लक्षात घेता बालकांवर तातडीने उपचार करणे प्रशासनाला कठीण होणार आहे. या परिस्थितीत बालरोगतज्ज्ञ संघटना प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला मदत करणार आहे.

मराठवाड्यातील सुमारे ४०० बालरोगतज्ज्ञ प्रशासनाला मदत करून कोविड पॉझिटिव्ह बालकांना आरोग्यसेवा देणार आहेत. त्यासाठी भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेकडून प्रत्येक जिल्ह्याचे नियोजनदेखील सुरू आहे. दरम्यान, कोविडची संभाव्य लाट कशी असेल, बालकांना दिले जाणारे उपचार, मुलांचे आजार, कोविडनंतर होणारी गुंतागुंत यासंदर्भात संघटनेकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मिशन कोविन उदय संकल्पना राबवणार
बालरोगतज्ज्ञ संघटनेकडून मिशन कोविन उदय ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय बालरोगतज्ज्ञांकडून माहिती दिली जात असून संभाव्य नियोजन केले जात आहे. संघटना या आपत्तीच्या काळात पूर्ण क्षमतेने प्रशासनाच्या बरोबरीने काम करणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी (ता. ३१) राज्याची बैठक होणार आहे. - डॉ. स्नेहल नगरे, जिल्हाध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना, हिंगोली

बातम्या आणखी आहेत...