आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज आढळले कोरोनाचे 87 रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2622, बळींचा आकडा 135

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालन्यात आठवा बळी, नांदेड आणि लातुरात प्रत्येकी दाेघांचा मृत्यू

जिल्ह्यात आज सकाळी 87 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2622 झाली आहे. यापैकी 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 135 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर आता 1087 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :  इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), एन अकरा, हडको (1), एन सहा सिडको (2), मयूर नगर, एन अकरा (1), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर, एन दोन, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको एन अकरा (1), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), हडको एन अकरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया ‍विहार (3), एन नऊ सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2), एन दोन सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये 60 पुरूष आणि 27 महिलांचा समावेश आहे.

मराठवाड्यात दिवसभरात 12 जणांचा मृत्यू, 140 कोरोनाग्रस्तांची झाली नोंद

मराठवाड्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी विभागात १४० नवे रुग्ण, तर १२ मृत्यूची नोंद करण्यात आली. जालना शहरातील शंकरनगर भागातील ४२ वर्षीय रुग्णाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे. तसेच जिल्ह्यात ७ नवीन रुग्ण आढळले.

बीडमध्ये शुक्रवारी २ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे २ रुग्ण दगावले, तर १० अहवाल पाॅझिटिव्ह आले. लातूर जिल्ह्यात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दोघाही रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त होते. या दोघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.

हिंगोली जिल्ह्यात आणखी २ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून हे दोघेही वसमत येथील आहेत. वसमत एक रुग्ण नांदेड येथे मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता. एक २५ वर्षीय महिला मुंबई येथून आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आैरंगाबादेत ११५ पाॅझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू

आैरंगाबाद : जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी ११५ ने वाढ झाली. यात ४६ महिला, तर ४८ पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २,५४५ झाली आहे. यापैकी १४०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता १००० जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या १३५ वर गेली.

बातम्या आणखी आहेत...