आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठवाडा कोरोना:एका दिवसात कोरोनाचे 52 बळी, उस्मानाबाद 226, बीड 176, जालन्यात 136 नवे रुग्ण

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोना बळींची संख्या 30 हजारांपुढे

मराठवाड्यात मंगळवारी १,६५९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ५२ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. यात सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात ११ त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात २, बीड ८, हिंगोली १, परभणी ९, नांदेड ३, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर औरंगाबाद जिल्ह्यात ४०६, जालना १३६, बीड १७६, हिंगोली १९, नांदेड ३४५, परभणी ५२, लातूर २९९ तर उस्मानाबाद जिल्ह्यात २२६ अहवाल पॉझिटिव्ह आले.

राज्यात कोरोना बळींची संख्या 30 हजारांपुढे
मुंबई | राज्यात मंगळवारी ५१५ मृत्यूंची नोंद झाल्याने कोरोना बळींनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला असून आता मृतांची एकूण संख्या ३०,४०९ झाली आहे. मंगळवारी आणखी २०,४८२ नव्या रुग्णांची भर पडली. मात्र १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले आहे. एकूण रुग्णांची संख्या १०,९७,८५६ झाली असून त्यापैकी २,९१,७९७ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबईत मरीन ड्राइव्हवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे.