आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादमध्ये आज 22 नवीन रुग्णांची वाढ तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, एकुण रुग्णसंख्या 1327

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना जिल्ह्यात 13, हिंगोलीत 9, तर नांदेडमध्ये 6 नवे रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1327 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4),  जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 11 महिला आणि 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू 

जयभीमनगर 72 वर्षीय व्यक्तीचा 26 मे रोजी पहाटे 1 वाजून 50 मिनिटांनी मृत्यू झाला आहे.त्यांना यापूर्वी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तर जाधववाडीतील 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांना 18 मे रोजी भरती करण्यात आले होते.19 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 26 मे रोजी पहाटे साडेबारा वाजता त्याचा मृत्यू झाला आहे.

२१ दिवसांनी प्रथमच आैरंगाबाद शहरात काेरोनाची रुग्णसंख्या घटली. साेमवारी शहरात २० जणांचे काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १३०५ झाली. ४ मे राेजी शहरात फक्त १५ रुग्ण आढळले हाेते. दरम्यान, रविवारी रात्रीपासून ते साेमवारी सकाळपर्यंतच्या ९ तासांत ५ काेराेनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळींची संख्या ५५ झाली आहे. मृतांमध्ये चार महिलांचा व एका पुरुषाचा समावेश आहे.

जालना :

सोमवारी रुग्णसंख्या ७४ वर गेली. ४ नवे रुग्ण जुना जालना भागातील खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. यातील महिला कर्मचाऱ्याच्या एका वर्षाच्या मुलालाही बाधा झाली आहे. पाच जणांत एक शिरनेर (ता. अंबड) हनुमंतखेडा व कानडी (ता. मंठा) येथील प्रत्येकी एक, तर दोन रुग्ण नूतनवाडी (जालना) येथील आहेत.

नांदेड :

जिल्ह्यात सोमवारी ६ अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १३३ झाली. एका बळीमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ झाली. माहूर तालुक्यातील वडसा व किनवटच्या दहेली तांडा येथेही रुग्ण आढळले आहेत.

हिंगोली :

कळमनुरी तालुक्यात असलेल्या क्वॉरंटाइन सेंटरमधील ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील ४ जण मुंबई, ३ जण रायगड, एक जण पुण्यावरून आलेला आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या १५९ वर पोहोचली आहे.

बातम्या आणखी आहेत...