आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:औरंगाबादेत बळींचे शतक, मराठवाड्यात दिवसभरात 91 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद 70, हिंगोली 8, नांदेड-लातूर प्रत्येकी 2, बीड-उस्मानाबादेत प्रत्येकी 1 रुग्ण

मराठवाड्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून रविवारी दिवसभरात ९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक ७० रुग्ण औरंगाबादेत आढळले असून जालना ७, हिंगोली ८, नांदेड आणि लातुरात प्रत्येकी २, तर बीड आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. आैरंगाबादेत काेराेनाचा शिरकाव झाल्यापासून ८४ दिवसांत रुग्णसंख्येने तब्बल २ हजारांचा पल्ला, तर बळींनी शंभरी आेलांडली आहे. रविवारी दिवसभरात ७० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २०२० झाली आहे. पाच बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची संख्या १०४ वर पाेहाेचली आहे. आैरंगाबादेत ५ एप्रिल राेजी पहिला मृत्यू झाला हाेता. त्यानंतर अवघ्या ६३ दिवसांत आणखी १०३ जणांचे मृत्यू झाले.

जालना जिल्ह्यात पाचवा बळी, ७ अहवाल पाॅझिटिव्ह

जाफराबाद शहरातील ५२ वर्षीय रुग्णाचा ५ जून रोजी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे हा जालना जिल्ह्यातील पाचवा बळी ठरला आहे. शिवाय, रविवारी जालना जिल्ह्यात ७ रुग्ण आढळल्याने जालना जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०५ वर जाऊन पोहोचली आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बीड येथील ६१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्णसंख्या ३० वर गेली आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले, तर उस्मानाबादेत १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.

बातम्या आणखी आहेत...