आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबाद मध्ये आणखी 7 रुग्ण सापडले, रुग्ण संख्या 627 वर; तर आतापर्यंत जिल्ह्यात 15 मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
गजानन महाराज चाैकाजवळील भाजी मंडईतील ग्राहक गर्दी करून स्वत:हून काेराेनाला निमंत्रण देत आहेत. - Divya Marathi
गजानन महाराज चाैकाजवळील भाजी मंडईतील ग्राहक गर्दी करून स्वत:हून काेराेनाला निमंत्रण देत आहेत.
  • मराठवाड्यात आणखी 64 कोरोना पाॅझिटिव्ह, नांदेडात 6, तर जालन्यात 3 नवे रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी 7 रुग्ण सापडेल आहेत. दुपारी 17 रुग्ण सापडले होते, तसेच सकाळी विविध भागातील 44 कोविडबाधित रुग्णांची वाढ झाली होती. यासोबतच आता जिल्ह्यातील एकूण आकडा 627 वर गेला आहे.

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील जुना बाजारमध्ये (5), बेगमपुरा(2), न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक 06 (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक 05 (05),  कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (06), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (03) हा परिसर आहे. या रुग्णांमध्ये 27 पुरूष आणि 17 महिलांचा समावेश आहे. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 619 वर पोहोचली असल्याचे मिनी घाटी प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यासोबतच आज शहरात 15 वा मृत्यू झाला आहे. एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मागील बारा तासात दोघांचा मृत्यू झाला आहे.

राम नगरातील कोविडबाधिताचा मृत्यू

मुकुंदवाडी येथील राम नगरातील 80 वर्षीय कोविड बाधित पुरूष रुग्णाचा मध्यरात्री 1.10 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले. घाटी रुग्णालयात ताप, खोकला आणि दम लागत असल्याने त्यांना 8 मे रोजी दुपारी भरती केले होते.  त्यांचा 9 मे रोजी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर 8 मेपासूनच कोविडसाठी अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना 10 मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कळवले आहे. 

तत्पूर्वी रविवारी २७ जणांना डिस्चार्ज मिळाला, त्यामुळे आता काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या ९२ वर गेली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात ३, नांदेडमध्ये ६, तर उदगीरमध्ये ५ नवे रुग्ण आढळले. यामुळे रविवारी एकाच दिवशी मराठवाड्यात ६४ नव्या रुग्णांची भर पडली. दरम्यान, राेशन गेट येथील ५० वर्षीय बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने औरंगाबादेत बळींची संख्या 14 झाली. रविवारी गारखेड्यातील न्यायनगर या नवीन भागात ५ रुग्ण आढळले आहेत. 

ग्रामीण भागातील संशयितांचे स्वॅब उपजिल्हा रुग्णालयातच घेणार

शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोना पोहाेचला आहे. शहरालगत असलेल्या दौलताबाद येथे २ रुग्ण आढळले होते. शहरातील नातेवाईकामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वडगाव कोल्हाटीला चेक नाक्यावर तपासणीदरम्यान एक रुग्ण सापडला होता. त्यामुळे गावात जाण्याआधीच त्याला रोखता आले. बजाजनगरातील इंद्रप्रस्थ कॉलनीतील आरोग्यसेविका कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. तसेच खुलताबाद शहरात मुंबईहून आलेला एक जण पॉझिटिव्ह निघाला होता, तर दोन दिवसांपूर्वी गंगापुरातील फुलशिवरा गावातील ७६ वर्षीय वृद्ध काेरोनाबाधित असल्याचे घाटीत तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्याच्या संपर्कातील पत्नी, मुलगा, सून व नात या चारही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या चाैघांवरही गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातच उपचार केले जात आहेत.

नांदेड : रुग्णांची संख्या ५१ : नांदेड येथे रविवारी पुन्हा सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५१ झाली.कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वजण यात्रेकरू असून त्यातील एक ठाण्याचा पुरुष, पंजाबमधील एक पुरुष, दोन महिला व उत्तर प्रदेशातील तीन महिलांचा समावेश आहे. 

जालना : तीन पॉझिटिव्ह

रविवारी जालना जिल्ह्यात ३, तर नांदेडला ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बीड जिल्ह्यात संशयितांचे ११ अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, लातूर जिल्ह्यात उदगीर येथे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तेथील रुग्णांची संख्या २७ झाली. जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील महिला व कानडगाव (ता. अंबड) येथील आई व तिचा मुलगा पॉझिटिव्ह आढळले. 

बीड : ११ अहवाल निगेटिव्ह

बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून संशयितांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. रविवारी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बीड व केज येथील रुग्णालयातून हे स्वॅब पाठवले होते. 

हिंगोलीतील कोरोनाबाधित ११ जवानांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. या जवानांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. 

परभणी : अत्यावश्यक सेवांना सूट | परभणी जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून राेज सकाळी ७ ते ११ ऐवजी दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना सवलत जाहीर केली. कोरोनाच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...