आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभराचा लेखाजोखा:मराठवाड्यात साडेअठरा लाख चाचण्या; पावणेदोन लाख पॉझिटिव्ह, 4,767 मृत्यू, औरंगाबादेत 5 लाख 93 हजार चाचण्या, 56 हजार पॉझिटिव्ह

औरंगाबाद (प्रवीण ब्रह्मपूरकर)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात सध्या कोरोनाचे दोन हजार रुग्ण आढळत आहेत.

मराठवाड्यात पहिला रुग्ण अाैरंगाबादला १५ मार्च २०२० राेजी सापडला हाेता. या वर्षभरात औरंगाबादसह संपूर्ण विभागात कोरोनाने थैमान घातले. गेल्या वर्षात आरटीपीसीआर, अँटिजन अशा १८ लाख ३९ हजार ९२४ चाचण्या केल्या आहेत. त्यात १ लाख ७८ हजार ९९५ रुग्ण पॉझिटिव्ह अाढळले. मराठवाड्याचा पॉझिटिव्हिटी रेट साधारण ९.७२ इतका आहे, तर ४,७६७ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

मराठवाड्यात सध्या कोरोनाचे दोन हजार रुग्ण आढळत आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये सापडतात. मराठवाड्यात संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.

गेल्या एक मार्चपासून औरंगाबादमध्ये रुग्ण वाढल्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के इतका आहे. वर्षभरात औरंगाबादमध्ये २ लाख ६१ हजार ७२१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात अाल्या. त्यापैकी ३३ हजार ८७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. हा दर १२.९४ इतका आहे. ३ लाख ३१ हजार ५३६ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ हजार ८०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ६.८८ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. जिल्ह्यात पाच लाख ९३ हजार २५७ चाचण्यांपैकी ५६६७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ९.५५ इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ४४.१२ टक्के रुग्ण आरटीपीसीआरमध्ये तर ५५.८८ टक्के रुग्ण अँटिजनच्या माध्यमातून आढळले आहेत. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण आणि सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. हिंगोलीत ७५ हजार ७१७ चाचण्या करून ४ हजार ७१२ रुग्ण आढळले. केवळ ६५ रुग्णांचा मृत्यू हिंगोली जिल्ह्यात झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३०० व्हेंटिलेटर
औरंगाबाद विभागात सर्वाधिक गंभीर रुग्ण घाटीत दाखल होतात. घाटीत ५ हजार ०६९ रुग्ण आतापर्यंत भरती झाले आहेत. त्यात १०६० जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यात सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालये मिळून ३०० व्हेंटिलेटर आहेत.

चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ हजार ८०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ६.८८ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. जिल्ह्यात पाच लाख ९३ हजार २५७ चाचण्यांपैकी ५६६७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ९.५५ इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ४४.१२ टक्के रुग्ण आरटीपीसीआरमध्ये तर ५५.८८ टक्के रुग्ण अँटिजनच्या माध्यमातून आढळले आहेत. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण आणि सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. हिंगोलीत ७५ हजार ७१७ चाचण्या करून ४ हजार ७१२ रुग्ण आढळले. केवळ ६५ रुग्णांचा मृत्यू हिंगोली जिल्ह्यात झाला आहे.

वर्षभरात ४७६७ लोकांचा झाला मृत्यू
मराठवाड्यात गेल्या वर्षभरात ४,७६७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागात ३०८५ तर शहरात १,६६२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये औरंगाबाद १,३३६, जालना ४११, परभणी ३४२, हिंगोली ६८, नांदेड ७०१, बीड ६१०, लातूर ७१५, उस्मानबाद ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...