आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना संपायचे नाव घेत नाही. पहिल्या लाटेनंतर यावर्षी दुसरी लाट आली आणि तिने अक्षरश: थैमान घातले. मार्च ते मे महिन्यात मराठवाड्यात रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. पण जून महिना सुरू होताच दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र होते. आता मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वच जिल्ह्यांत ९५ टक्क्यांवर गेले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे.
दुसऱ्या लाटेत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे असंख्य नागरिकांना शहराचा धावा करावा लागला. सर्वत्र बेड फुल्ल होते. आरोग्य यंत्रणांवरील ताणही प्रचंड वाढला होता. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत होती. सद्य:स्थितीत बहुतांश जिल्ह्यात रुग्णसंख्या दोन आकड्यांवर आली.
नियमांचे पालन करावे
कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे यंत्रणेवरही ताण पडला. यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले. यासोबतच ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट तसेच लसीकरणावर भर दिला. यामुळे कोरोना नियंत्रणात आला. यात नागरिकांनीही नियमांचे पालन करत साथ दिली. -डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना.
मृत्युदराची डोकेदुखी कायम
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.