आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादीतही बंडाळी; राष्ट्रवादीच्या प्रा. ईश्वर मुंडे यांचा अर्ज, भाजपचे प्रवीण घुगेही अर्ज भरणार

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडे यांचे दुसरे समर्थक प्रवीण घुगे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमधील बंडाळीची लागण राष्ट्रवादी काँग्रेसलाही झाली असून बंडखोरीचे हे केंद्र बीड जिल्ह्यातच आहे. भाजपमध्ये बीडचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे यांनी बुधवारी औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचा झेंडा फडकावला आहे. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली असून ते गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार, १२ रोजी अखेरचा दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला भाजपकडून उमेदवारी नाकारलेले पंकजा मुंडे यांचे दुसरे समर्थक प्रवीण घुगे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. घुगे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. पदवीधरसाठी भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली असून रमेश पोकळे, घुगे आणि माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड असे तीन स्वकीयच आडकाठी ठरत आहेत.

पुणे : संग्राम देशमुखांचा अर्ज

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी भाजपच्या वतीने संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला. पुण्यात बुधवारपर्यंत ३७ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात १६ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले आहेत.

नागपूर पदवीधरसाठी भाजपतर्फे महापौर संदीप जोशी, काँग्रेसचेे अॅड. अभिजित वंजारी तर वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, आंबेडकरी चळवळीतील अतुल खोब्रागडे, विदर्भवादी संघटनांचे नितीन रोंघे हे सर्व उमेदवार गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...