आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बैठकीची मागणी:सहा वर्षांपासून मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीची प्रतीक्षा; 2008 आणि 2016 ला झाली होती बैठक

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2008 मध्ये विलासराव देशमुख, 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर सरकार औरंगाबादकडे फिरकलेच नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून औरंगाबादेत बैठक घ्यावी, अशी लोकांची अपेक्षा आहे. मराठवाडा विभागीय आयुक्तालयाच्या त्रिभाजनाच्या अहवालावरही त्यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

विदर्भाच्या विकासासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. म्हणून मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी, असे संकेत आहेत. 2008 मध्ये डॉ. उमाकांत दांगट विभागीय आयुक्त असताना त्यांच्याच कार्यकाळात बैठक झाली होती. दिव्य मराठीशी बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली तर अनेक प्रश्न सुटतात. वॉटरग्रीडपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय, अॅग्रीकल्चर महाविद्यालय होणे गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्पावर कार्यवाही आवश्यक आहे.

नदीजोड प्रकल्प रखडला

केंद्र सरकारने 2015 मध्ये 16 नदीजोड प्रकल्पांचा निर्णय घेतला. त्यात मराठवाड्यासाठी दमणगंगा पिंजाळ प्रकल्पातून पाणी आणण्याचे ठरले. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. जलतज्ज्ञ शंकरराव नागरे म्हणाले की, मराठवाड्यात पाणी आणण्याऐवजी सिन्नर (जि. नाशिक) विभागात मुकणेतून पाणी वळवण्याच्या हालचाली आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले होते की, जायकवाडीच्या कालवे दुरुस्तीसाठी लागणाऱ्या 2500 कोटींसाठी सर्वेक्षणाचे काम सुरू असून डीपीआर तयार होणार आहे. आता हे 2500 कोटी शिंदे सरकार देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...