आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातला ७६३ कोटी निधी मिळाला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. दोन महिन्यांपासून शेतकरी निधीसाठी प्रतीक्षेत होते.
मराठवाड्यात ४७ लाख ७४ हजार ४८९ शेतकऱ्यांचे ३६ लाख ५२ हजार ८७२ हेक्टरचे नुकसान झाले होते. राज्य शासनाच्या वतीने १३ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा हजार कोटीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये वाढीव दरानुसार ३७६२ कोटींची अतिवृष्टीसाठीची मदत राज्य सरकारच्या घोषणेनुसार मंजूर झाली होती. त्यापैकी राज्य शासनाने ७५ टक्के याप्रमाणे मराठवाड्याला मिळालेल्या २८६० कोटींच्या निधीचे वाटप केले. मात्र दुसऱ्या हप्त्याची ७६३ कोटींची रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळालीच नाही.
औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले ९८ कोटी
राज्य शासनाने हेक्टरी दहा हजार याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात शासनाचे एक हप्ता देत ७५ टक्के मदत दिली. मात्र त्यानंतरचा निधी शासनाने दिलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ९८ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जालना ९३ कोटी २७ लाख, परभणी ६७ कोटी ८१ लाख, हिंगोली ५६ कोटी १७ लाख, नांदेड १३६ कोटी, बीड १४२ कोटी, लातूर ९७ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७१ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.