आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘हिंट’ मिळाली होती, पण मोदींचा निरोप येईपर्यंत धाकधूक होतीच; मंत्रिपदाच्या माध्यमातून मराठवाड्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवू : कराड

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबादला केंद्रात प्रथमच मंत्रिपदाचा मान

‘केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे संकेत एक दिवस आधीच मिळाले हाेते. त्यामुळे ६ जुलै राेजी आधी मुंबई जवळ केली. पक्षातून ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच राताेरात दिल्ली गाठली. पण ७ जुलै राेजी सकाळपर्यंत माेदींच्या कार्यालयातून निराेपच आला नाही त्यामुळे घालमेल वाढत हाेती. मात्र सकाळी १० वाजता ‘भेटायला या’ असा फाेन आला अन‌् गेली ३० वर्षे केेलेल्या पक्षकार्याचे चीज झाल्याची भावना निर्माण झाली. महाराष्ट्रातील इतर तीन नियाेजित मंत्र्यांसाेबत पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेलाे. तिथे माेदींनी अभिनंदन केले तेव्हा खूप आनंद झाला,’ अशी भावना भाजपचे राज्यसभा सदस्य डाॅ. भागवत कराड यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली.

औरंगाबादचे प्रसिद्ध बालराेगतज्ञ डाॅ. कराड अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे मूळ रहिवासी. १९७७ मध्ये त्यांनी औरंगाबादेतून एमबीबीएस केले. १९८१ मध्ये एमएस जनरल सर्जन, १९८४ मध्ये मुंबईतून एमएचएच बालरोग सर्जनची पदवी घेतली. अनेक वर्षे त्यांनी औरंगाबादेत रुग्णसेवाही केली. नंतर ते भाजपच्या माध्यमातून राजकारणात आले. नगरसेवक, उपमहापाैर, दाेनदा महापाैरपद भूषवणारे डाॅ. कराड यांना फडणवीस सरकारच्या काळात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपदही भूषवण्याची संधी मिळाली. अनेक दिग्गजांचे दावे असतानाही भाजपने एप्रिल २०२० मध्ये त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यापेक्षाही जास्त आश्चर्य आता मंत्रिमंडळात त्यांचे नाव आल्याने पक्षातील व इतर पक्षातील नेत्यांना वाटते.

मुलांनी दिल्लीतच घरी बसून पाहिला सोहळा
बुधवारी शपथविधी समारंभास कराड यांच्या पत्नी डाॅ. अंजली उपस्थित हाेत्या, तर त्यांची दाेन मुले हर्षवर्धन आणि वरुण हे दिल्लीतील खासदार निवासात बसून टीव्ही साेहळा पाहत हाेते. ‘वडील मंत्री झाल्याचा आनंद आहेच. त्यांच्या ३० वर्षांच्या पक्षकार्याची दखल भाजपने घेतल्याचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटताे,’ असे हर्षवर्धन यांनी सांगितले. डॉ. कराड यांना पुरणपोळी खाण्यास आवडते. रोज सकाळी वाचन आणि दीड तास चालणे हा दिनक्रम त्यांनी कधीही चुकवला नाही, असे हर्षवर्धन याने सांगितले.

मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य
डाॅ. कराड म्हणाले, ‘वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष राहिल्याने मला मराठवाड्यातील प्रश्नांची चांगली जाण आहे. रेल्वे, सिंचन, पर्यटन, कृषी, शिक्षण, आराेग्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेल. आठही जिल्ह्याचा दाैरा करून तेथील प्रश्नांविषयी बैठका घेणार आहे. डीएमआयसी आणि पर्यटनाच्या दृष्टीने केंद्राच्या विविध विभागांसमवेत बैठका घेऊन जास्तीत जास्त निधी मराठवाड्यात आणू.’

माेदी म्हणाले, सुटी आहे म्हणून गावी पळू नका
डाॅ. कराड म्हणाले, ‘शपथविधी हाेण्यापूर्वी ७ जुलै राेजी सकाळी मी, नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील हे संभाव्य मंत्री माेदींच्या निवासस्थानी गेलाे. तिथे माेदींनी आमचे अभिनंदन केले तसेच मार्गदर्शनही केले. ‘तुम्हाला मी माेठी जबाबदारी देत आहे, ती कौशल्यपूर्वक सांभाळा. तुम्हाला जे खाते मिळेल त्याचा चांगला अभ्यास करा. अधिकाऱ्यांकडून विषय समजून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. सुटी आहे म्हणून गावी पळण्याची घाई करू नका. तुम्हाला जबाबदारीने देश चालवायचा आहे. आपल्या विषयात निष्णात बना,’ असा सल्ला माेदींनी आम्हाला दिला.

बातम्या आणखी आहेत...