आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारित वेळापत्रक:आयटीआय प्रवेशासाठी 21 ऑगस्टपर्यंत करता येईल अर्जाची नोंदणी, 27 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
 • कॉपी लिंक
 • नांदेड जिल्ह्यामध्ये 4000 जागा भरल्या जाणार, अशी आहे जिल्हानिहाय यादी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांबलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने १ ऑगस्ट पासून राबवली जात आहे. प्रवेश अर्ज नोंदणीसाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रवेश अर्ज नोंदणीसाठी मुदत वाढ दिली असून, आता 21 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. या मुदतवाढीमुळे आता संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अशी माहिती बुधवारी औरंगाबाद आयटीआयच्या वतीने देण्यात आली आहे.

माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 29 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस वेग आला आहे. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने आयटीआय अभ्यासक्रमास प्रधान्य देतात. 1 ऑगस्टपासून यासाठीची प्रवेश नोंदणी सुरु करण्यात आली होती. कोरोनामुळे सर्वच प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. 14 ऑगस्टपर्यंत यापूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. परंतु येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता 21 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.

मराठवाडा विभागातील शासकीय 82 आणि खाजगी पन्नास आयटीआय मिळून अशा एकूण 132 आयटीआयमध्ये 19 हजार 244 जागा भरल्या जाणार आहेत. सर्वाधिक नांदेड जिल्ह्यामध्ये 4000 जागा भरल्या जाणार आहेत, नांदेड पाठोपाठ लातूर जिल्ह्यामध्ये 18 आयटीआयच्या 3 हजार 268 जागा भरल्या जाणार आहेत अन्य जिल्ह्यात परभणी - 13 आयटीआयत 2,056 जागा, हिंगोली 7 आयटीआय 812 जागा धाराशिव 17 आयटीआय 2,164 जागा, बीड 24 आयटीआयमध्ये 3,076 जागा भरल्या जाणार आहेत. औरंगाबादमध्ये 11 शासकीयसह 6 खाजगी अशा 17 आयटीआयमध्ये 2,340 जागा भरल्या जाणार आहेत. तर जालन्यात 12 आयटीआय 1,528 जागा भरल्या जाणार आहेत.

असे आहे सुधारित वेळापत्रक

 • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे - 21 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत
 • पहिल्या फेरीसाठी विकल्प आणि प्राधान्य क्रम देण्यासाठीची मुदत 21 ऑगस्ट
 • प्राथमिक गुणवत्ता यादी 21 ऑगस्ट रोजी जाहीर होईल
 • या यादीबाबत असलेले आक्षेप, अर्जात बदल करण्यासाठी 26 ऑगस्टपर्यंत मुदत
 • 27 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी
 • 1 ते 5 सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्य क्रम देता येईल.
 • दुसऱ्या प्रवेशफेरीसाठी संस्थांची निवड झालेल्या उमेदवारांची यादी 9 ऑगस्टला एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुळ प्रमाणपत्रांची पडताळणी करुन प्रवेशासाठी यावे लागेल.
 • 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत तिसऱ्या फेरीसाठी प्राधान्य क्रम देता येईल.
 • 18 सप्टेंबर रोजी संकेतस्थळावर अथवा एसएमएसद्वारे निवड यादी कळवण्यात येईल.
 • चौथ्या फेरीसाठी 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान प्राधान्य क्रम देता येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागतील.
 • अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरुन, विकल्प सादर करणे, अर्जातील दुरुस्ती करुन प्रवेश निश्चित करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मुदत असेल.
 • 5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी अर्ज करता येतील.
 • 8 ऑक्टोबरला समपुदेशनसाठी जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ऑनलाइन जाहिर होईल.
 • 9 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या क्रमांकानुसार दिलेल्या वेळ आणि तारखेनुसार प्रवेशाबाबत कळवण्यात येईल.
 • तर खासगी संस्थेतील प्रवेश हे 30 ऑगस्ट ते प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम तारखेपर्यंत करता येतील. असे संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...