आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हर घर संविधान' अभियान:मराठवाडा लेबर युनियनतर्फे प्रत्येक घरात संविधान पोहचवण्याचा निर्धार

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी पातळीवर 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात आहे. मात्र, मराठवाडा लेबर युनियनने 'हर घर संविधान' अभियान राबवण्याचा निर्धार केला आहे. सर्वसामान्यांना सन्मानाने जगता यावे, याकरीता सामाजिक न्यायाचा दस्ताऐवज असलेले संविधान प्रत्येक घरात पोहोचणे आणि त्याचे वाचन होऊन आपले हक्क, कर्तव्य याची प्रत्येक भारतीयाला जाणीव व्हावी यासाठी हे अभियान राबवत असल्याचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी सांगितले. माथाडी व असंघटीत कष्टकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

आजही अन्नदात्याचीच आत्महत्या

सुभाष लोमटे म्हणाले, देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. एकीकडे मूठभर लोक अब्जाधीश झाले तर, दुुसरीकडे बेरोजगारी, महागाई वाढत आहे. अन्नदात्यास आत्महत्या कराव्या लागत आहेत. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, महिला, अल्पसंख्यांक सामाजिक न्यायापासून कोसो दूर आहेत. देशात समान व किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या प्रश्नांवर 9 ते 15 ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांद्वारे जागृती करून जिल्हा प्रशासनाकडे मागण्या मार्गी लावण्यासाठी आग्रह धरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी जय किसान आंदोलन - स्वराज अभियानचे जिल्हाध्यक्ष कासम भाई यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कागद कांच पत्रा कामगार संघटनेच्याआशाबाई डोके, श्रमिक मुक्ती दलाचे सुभेदार मेजर सुखदेव बन, कन्नड गोदामाचे साथी फारूख भाई, माथाडी कामगार प्रतिनिधी साथी देवचंद आल्हाट उपस्थित होते.

हे आहेत महत्त्वाचे निर्णय

१. घोषित हमी भावाचा कायदा करण्यासाठी आंदोलन उभारावे. यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती मोहिम घ्यावी.

२. भूूमीहिनांनी जगण्यासाठी सरकारी, गायरान किंवा जंगल जमिनीवर केले अतिक्रमण नियमित करावे म्हणून जनजागृती

३. जिल्ह्यात माथाडी कामगार, कचरा कामगार, मोलकरणी, बेघर, पेन्शन धारक, भूमीहीन - शेतमजुर, कष्टकरी शेतकरी यांचे मेळावे भरवणे.

बातम्या आणखी आहेत...