आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दर वर्षी दिला जाणारा मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शोधवार्ता व उत्कृष्ट वार्ता या दोन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गत 12 वर्षापासून उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असून, पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे.
उत्कृष्टवार्ता व शोधवार्ता या दोन गटासाठी दैनिकाच्या प्रतिनिधींनी एक डिसेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दैनिकात नावासह प्रकाशित झालेले किंवा नाव नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र आणि प्रकाशित साहित्याची मूळ प्रत व त्याची तीन साक्षांकित प्रती, वार्ताहराचे दोन पासपोर्ट फोटो, पाकिटावर कोणत्या गटासाठी प्रवेशिका पाठवत आहे, त्याच्या स्पष्ट नामोल्लेखासह 25 डिसेंबर 2022 पर्यंत उदगीर तालुका पत्रकार संघ, व्दारा दैनिक यशवंत विभागीय कार्यालय नगर परिषद व्यापारी संकुल ई बिल्डींग पहिला मजला उदगीर जि. लातूर पीन कोड 413517 येथे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट वार्ता गट
प्रथम पुरस्कार जेष्ठ पत्रकार महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जून मुद्दा यांच्या वतीने रोख 5000/-रुपये स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र,व्दितीय पुरस्कार कै.वसंतराव बांगे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ संपादिका निर्मलाताई बांगे यांच्या वतीने रोख 3000/-रुपये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार जेष्ठ पत्रकार अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत अपसिंगेकर यांच्या वतीने रोख 2000/- रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
शोधवार्ता गट
प्रथम पारितोषिक जेष्ठ पत्रकार महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जून मुद्दा यांच्या वतीने रोख 5000/- रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,व्दितीय पारितोषिक वृत्तपत्र विद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने रोख 3000/- रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक नागनाथराव बिरादार यांच्या स्मरणार्थ दयानंद बिरादार यांच्या वतीने रोख 2000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोधवार्ता पुरस्कारासाठी मराठवाड्यातील पत्रकारांनी आपली प्रवेशिका पाठवावे, असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, सचिव दयानंद बिरादार व पदाधिकार्यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.