आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद मुक्ती संग्राम दिन:17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन; विभागीय आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेची तथा ध्वजारोहणा संबंधी काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित विभागास दिले.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी सिध्दार्थ उद्यान येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त्‍ डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, उपायुक्त (सा.प्र.) जगदिश मिनीयार तसेच क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, सामाजिक वनीकरण, अग्निशमन विभाग, सामाजिक वनीकरण, समाज कल्याण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गर्दी होणार नाही याची काळजी घ्या

केंद्रेकर म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी कार्यक्रमस्थळाचा परिसर निर्जंतुक करणे तसेच सुरक्षित अंतरासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी तसेच ऐनवेळी उपस्थित राहणारे पाहुणे यांची राजशिष्टाचाराप्रमाणे सोशल डिस्टन्सचे पालन होईल, याची काळजी घेत आसन व्यवस्था करण्याचे निर्देशही केंद्रेकर यांनी संबंधितांना दिले.

बातम्या आणखी आहेत...