आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा मंत्र्यांची माहिती:विदर्भ मराठवाड्याचा मोठा भाऊ, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 25 हजार मेगा वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार - डॉ. नितीन राऊत

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • 17 हजार मेगा वॅट प्रकल्पास सुरुवात, बेजरोजगारांच्या हाताला काम मिळेल, उद्योग, व्यवसायाला गती मिळणार

विदर्भ मराठवाडा वेगळे नाहीत. मोठा भाऊ म्हणून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत. जुने औष्णिक वीज प्रकल्प सुरु राहातील. मात्र, नव्याने औष्णिक प्रकल्प उभारला जाणार नाही. त्याऐवजी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात २५ हजार मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यापैकी १७ हजार मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल व उद्योग, व्यवसायाला गती मिळणार आहे. अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या संसाधनामध्ये झपाट्याने घट होत आहे. यामुळे अनेक वीज निर्मिती प्रकल्प कागदी हत्ती बनले आहेत. मोडकळीस आलेले वीज निर्मिती प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज निर्मितीसाठी सरकारने नवीन धोरण ठरविले असून, त्यानुसार जूने प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आणि राज्यात यापुढे नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्या ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प प्रभावीपणे राबवून वीज निर्मितीवर भर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकमताने घेण्यात आला आहे. विशेषत: दुर्गम, वाड्या, वस्त्या, पाड्यावर वीज पोहोचवण्याचे आव्हान पेलण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु केले जाणार आहेत. यामुळे विभागात रोजगार मिळणार असून, उद्योग-व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोरोनामुळे मुदवाढ सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रथम १७ हजार मेगा वॅट सौर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लॉकडाऊन मुळे या प्रकल्पासाठी आवश्यक ते कामे वेळेत पूर्ण करता आलेली नाहीत. कोरोनाच्या दोन लाटेमुळे त्या प्रकल्पासाठी करावे लागणारे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बिडकीन येथे उपविभाग सुरु करण्याबाबत मागणी आली आहे, त्याबाबत विचार सुरु असल्याचेही ऊर्जामंत्रांनी सांगितले.

वीजबिल माफी देणे अशक्य कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय बंद होते. आर्थिक घडी विस्कटली आहे. व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. व्यवसाय नसल्याने त्यांना थकीत वीजबिल भरता आलेले नाही. त्यांच्या परिस्थितीचा विचार करून वीजबिल माफीची मागणी होत आहे. यावर काही निर्णय घेणार आहात का? असा प्रश्न उपस्थित केला असता, त्यांन वीजबिल माफी देणे अशक्य आहे. वीज कंâपनीचे काम नसून, केंद्र आणि राज्य सरकारने यावर निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले. केंâद्र सरकारने वीजमाफीबाबत निर्णय घेतल्यास त्यासाठी राज्य सरकार आपली भुमिका पार पाडील. अशी भ्ूमिका स्पष्ट केली.

न्यायप्रविष्ठ प्रकरण पदोन्नतीतील आरक्षण संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या संदर्भात भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शेतकऱ्यांचे सरकार महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी खास शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा मान सन्मान करण्यात आला होता. सरकारचे धोरण शेतकऱ्यासाठीच आहे. महाऊर्जा, सौर ऊर्जा आदी योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सबसिडी उद्योजकांना मदत नव्हे तर उद्योगासाठी मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगासाठी सबसिडी बंद करण्यात आलेली नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट करतांना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, सबसिडी उद्योजकांना मदत करण्यासाठी नव्हे तर उद्योग वाढीसाठी होती. एक महिन्याचा सबसिडीसाठी निधी देणे बाकी आहे. मात्र आमच्याकडे सबसिडी एकाच जिल्ह्याकडे दिली जाते, अशा आशयाचा तक्रारी आल्या होत्या. त्या नुसार तपासाणीचे काम आमच्या विभागकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद कोरोना काळात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने एकजुटीने, एकदिलाने काम केले. राज्यात किती मोठे संकट आले तरी त्या संकटावर मात करु हे यातुन दिसून आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे ५ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचे सरकार पहाटे शपथविधी घेणारे नव्हते, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

पितळ उघडे
शहर वीज वितरण व्यवस्था जूनी व जीर्ण झालेली आहे. त्यावर ठोस उपाययोजना, वीज सक्षमीकरण करण्याऐवजी थातूरमातूर देखभाल दुरुस्तीची कामे केली जाते. यामुळे दररोज कुठल्या ना कुठल्या भागात एक ते दोन तासांसाठी वीज खंडित होते. याचा प्रत्यय शुक्रवारी खुद्द ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना देखील आला. पत्रकार परिषद सुरु असताना व उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी जात असतानाच्या दरम्यान तीन वेळ वीज गुल झाली. दालनात अंधार झाला होता. त्यांच्यासमोरच वीज वितरण व्यस्थेचे पितळ उघडे पडले.

बातम्या आणखी आहेत...