आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोनाने मराठवाड्यातील 1296 बालकांचे बाबा हिरावले तर औरंगाबादमधील संख्या 265, 1358 बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आैरंगाबाद विभागातील एकपालक किंवा आई व वडील नाहीत, अशा १८ वर्षांखालील मुलांचे सर्वेक्षण सुरू

कोराेनाचा संसर्ग हाेऊन काेणाचे बाबा तर काेणाचे बाबा हिरावले आहे. ज्यांचे बाबा हिरावले अशांची संख्या मराठवड्यात १२९६ असून, औरंगाबाद जिल्हयातील २६५ बालके आहेत. तर सर्वाधिक बीड जिल्हयात २७४ बालके आहेत. त्यांचे बाबा कोरोनामुळे मृत्यू पावले आहे. तर २७ चिमुकल्यांचे आई आणि वडिलही राहिले नसून त्यांच्या वाटेला अनाथपण आले आहे. तर १३५० बालकांना विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्यासह ग्रामरक्षक कृती दलाच्या माध्यमातून कोराेनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या १८ वर्षांपेक्षा लहान मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. कोराेनाचा संसर्ग ग्रामीण भागात झपाट्याने झाल्याने अनेक लहान मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. आैरंगाबाद विभागातील एकपालक किंवा आई व वडील नाहीत, अशा १८ वर्षांखालील मुलांचे सर्वेक्षण सुरूच असून रोज माहिती संकलित केली जात आहे. अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या प्रभारी उपायुक्त हर्षा देशमुख यांनी सांगितले. महिला व बालविकास विभागाकडून कराेनामुळे दाेन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या मदतीसाठी १०९८ हा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक असून त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असेही देशमुख यांनी सांगितले तर, कोरोनामुळे मृत्य पावलेल्या पालकांच्या पाल्यांची माहिती घेण्याबरोबरच त्या बालकांची देखील माहिती संकलित केली जात आहे. ज्यांना विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. अशी औरंगाबादमध्ये एकूण ३३८ तर मराठवाड्यात १३५८ बालके आहेत. ज्यांना काळजी आणि सरंक्षणाची गरज आहे. याची माहिती देखील शासनस्तरावर पाठविण्यात येत आहे. सोमवारी दुपारपर्यंत आलेल्या माहितीनुसार २७ बालके अनाथ झाली असून, १८१ बालकांची आई आणि १२९६ बालकांचे बाबा करोनाने हिरावले आहेत.

अशी आहे आकडेवारी -
कोरोनाने आई आणि बाबा हिरावलेल्या बालकांची एकूण संख्या २७ आहे. ज्यात औरंगाबादमधील १३, जालना १, परभणी १, हिंगोली, बीड ३, नांदेड ५, उस्मानाबाद २ आणि लातूर १ आदींचा समावेश आहे.

करोनामुळे बाबांचा मृत्यू झालेल्या बालकांची एकूण संख्या १२९६ आहे. ज्यात औरंगाबादमध्ये २६५, जालना ६१, परभणी १३४, हिंगोली ३९, बीड २७४, २५४, उस्मानाबाद ९१, लातूर १७८ आदी बालकांचा समावेश आहे.

काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची आकडेवारी -
औरंगाबाद ३३८, जालना ६७, परभणी १२३, हिंगोली ४७, बीड १८९, नांदेड २७९, उस्मानाबाद १११, लातूर २०४ आदी.

बातम्या आणखी आहेत...