आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला हुडहुडी:मराठवाडा, उ.महाराष्ट्र गारठला, विदर्भात थंडीची लाट; परभणीत 5.6 अंशांची नोंद

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद @ 9.2, नाशिक 9.1, अकोला 7.2

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. विदर्भात थंडीची लाट असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. राज्यात सोमवारी परभणी कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रात ५.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यातील हे नीचांकी तापमान आहे. हवामान विभागानुसार राज्यात या आठवड्यात पारा घसरलेलाच राहील.

गेल्या वर्षी राज्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची लाट आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठवडाभर आधीच विदर्भात थंडीची लाट आली असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसदृश परिस्थिती आहे. विदर्भात बहुतेक जिल्ह्यात सोमवारी किमान तापमान सरासरी ३ ते ५ अंशांनी घसरले होते. गोंदिया येथे ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर अकोला कृषी विद्यापीठात ७.२ अंश तापमान नोंदले गेले. भारतीय हवामान विभागानुसार २४ डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या आठवड्यात किमान तापमान २ ते ४ अंशांनी घसरलेले राहील.

औरंगाबाद @ 9.2, नाशिक 9.1, अकोला 7.2
राज्यात परभणी, अकोला, यवतमाळ, गोंदिया येथे सोमवारी किमान तापमान सरासरीपेक्षा ५ ते ८ अंशांनी घसरले. राज्यातील प्रमुख शहरांतील सोमवारी नोंदवलेले किमान तापमान असे : अकोला शहर - ९.६, अकोला कृषी विद्यापीठ - ७.२ अमरावती - ११.१, औरंगाबाद - ९.५, बुलडाणा - ११.४, जळगाव - १०.५, मालेगाव - १०.८, नागपूर - ८.४, नांदेड - ११, नाशिक - ९.१, उस्मानाबाद - १३.५, परभणी शहर - ८.१, परभणी कृषी विद्यापीठ - ५.६, सोलापूर - १३.४, यवतमाळ -७, पुणे - ९.२

बातम्या आणखी आहेत...