आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्राचार्य प्रताप बोराडे आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रचार्य प्रताप बोराडे आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना देण्याचा निर्णय १७ जानेवारी रोजी मसापच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

२०२० चा जीवन गौरव पुरस्कार बोराडे यांना तर २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार हा डॉ.कोत्तापल्ले यांना दोघांचे दीर्घकाळापासून परिषदेशी असलेले निकटचे संबंध आणि दोघांनी साहित्य परिषदेच्या उभारणीत केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कामाची नोंद आणि त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांना परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येईल. अशी घोषणा गुरुवारी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. यावेळी परिषदेचे प्रा.किरण सगर, कार्यवाह डॉ.दादा गोरे आणि कोषाध्यक्ष के.एस.अतकरे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...