आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यिक कार्यक्रमांना स्थगिती:कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यक्रम पुढे ढकलले

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कठोर अंमलबजावणीचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाडा साहित्य परिषदेने आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलत असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हे कार्यक्रम स्थगित करत आहोत अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह दादा गोरे यांनी सोमवारी दिली.

दादा गोरे यांनी कार्यक्रम पुढे ढकलत असल्याची माहिती देताना त्या सर्व कार्यक्रमांची यादी जारी केली. त्यानुसार, दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मिळाल्यामुळे होणारा जाहीर सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी 2021 रोजी कविता दिनाच्या निमित्ताने काव्यपुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम सुद्धा आता स्थगित करण्यात आला आहे.

यासोबतच 3 मार्च 2021 रोजी प्राचार्य डॉ. प्रतापराव बोराडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी सोहळा आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम सुद्धा पुढे ढकलला जात आहे असे गोरे यांनी सांगितले. हे तिन्ही कार्यक्रम पुढे ढकलले जात असले तरी ते आता कोणत्या तारखेला आयोजित केले जातील याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पुढील कार्यक्रमांच्या तारखा आपणास योग्य वेळी कळविण्यात येतील असे दादा गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...